वेलडन मोहम्मद शमी ..! लालाभाईने चॅम्पियन खेळाडू कपिल देव यांना टाकले मागे; विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्यांदा केली अशी कामगिरी…

कपिल देव: आयसीसी विश्वचषक 2023 (World Cup 2023) मधील 21व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह विश्वचषक स्पर्धेतला न्यूझीलंडविरुद्धचा विजयाचा दुष्काळ देखील भारताने संपवला. या सामन्यात विराट कोहली बरोबरच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यानेदेखील आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोहम्मद शमीने 54 धावा देत 5 गडी बाद करत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले.

IND vs NZ मोहम्मद शमी

विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत एकाही सामन्यात मोहम्मद शमीला संधी मिळाली नव्हती. मागील दोन सामन्यात शार्दुल ठाकूर याला फारशी छाप सोडता आली नसल्याने व धर्मशाळाची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना अनुकूल असल्याने तसेच ऐन वेळेत हार्दिक पांड्या हा अनफिट झाल्याने संघात मोहम्मद शमीची वर्णी लागली. मिळालेल्या संधीचे सोनं करत शमीने पाच गडी टिपले. यासह विश्वचषक स्पर्धेत दोनदा पाच गडी बाद करण्याचा विक्रम त्याने केला. यापूर्वी विश्वचषक स्पर्धेत दोनदा 5 गडी बाद करण्याचा विक्रम कोणत्याच भारतीय गोलंदाजाला करता आला नाही.

मोहम्मद शमीने त्याच्या पहिल्या स्पेलमधील पहिल्याच चेंडूवर विल यंग याला त्रिफळाचीत केले. रवींद्र रचीन, डॅरल मिचेल, विल यंग, सेंट्नर, मॅट हेन्री यांची विकेट घेण्यात त्याला यश मिळाले. शमीने त्याच्या पाच विकेटपैकी तीन खेळाडूंना क्लीन बोल्ड केले होते. रवींद्र जडेजाने रवींद्र रचन याचा अवघ्या 23 धावांवर एक सोपा झेल सोडला. तो झेल पकडला असता तर न्यूझीलंडच्या धावांची संख्या वेगळीच असली असती. हा झेल सुटल्यानंतर मोहम्मद शमीच्या चेहऱ्यावर कसलाच राग दिसून आला नाही. तो शांतपणे पुन्हा बॉलिंग टाकण्यासाठी गेला.

मोहम्मद शमी

विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळताना पहिल्यांदा पाच गडी बाद करण्याचा विक्रम कपिल देव यांनी केला होता. त्यानंतर 1996 साली वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यानेही पाच गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. 2003 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने इंग्लंडविरुद्ध खेळताना पाच गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांनी 2011 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पाचगडी बात करण्याची किमया साधली होती.

मोहम्मद शमी यांनी 2019 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पाच बळी मिळवले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेत म्हणजे 2023 साली पाच गडी बाद करण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. कपिल देव, वेंकटेश प्रसाद, आशिष नेहरा आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी एकदाच पाच गडी बाद करण्याचा विक्रम केला होता.


हेही वाचा: