पाकिस्तानच्या प्रेक्षकांनी इरफान पठाणच्या डोळ्यावर मारला होता खिळा; वाचा नेमके काय आहे प्रकरण..

0

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी  स्टेडियमवर शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. सव्वा लाख लोकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा हाय व्होल्टेज सामना भारतीय संघाने सात गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघाच्या या दिमाखदार विजयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पोटात दुखू लागले. पीसीबीने भारतीय प्रेक्षकांच्या वर्तणुकीबद्दल तक्रार केली आहे. पण आयसीसीने पीसीबीच्या या तक्रारीकडे कानाडोळा केला आहे.

यानंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने पीसीबीला पाकिस्तानी प्रेक्षकांच्या वर्तणुकीचे उदाहरण सांगत चांगलेच सुनावले. 2006 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला होता, तेव्हा पेशावर येथे एका प्रेक्षकाने त्याच्या डोळ्यावर खिळा मारल्याची आठवण करून दिली.

पाकिस्तानच्या प्रेक्षकांनी इरफान पठाणच्या डोळ्यावर मारला होता खिळा; वाचा नेमके काय आहे प्रकरण..

इरफान पठाण सोबत नक्की काय झाले होते वाचा हा किस्सा?

इरफान पठाण ने आपल्या ट्विटर मध्ये लिहिले की, 2006 साली भारतीय संघ तुफान फार्मात होता. त्यावेळी आम्ही तेथे जाऊन दमदार प्रदर्शन करत होतो. मात्र आमची चांगली कामगिरी त्यांना बघवली नाही. पेशावर येथे एकदिवसीय सामना सुरू असताना एका पाकिस्तानी प्रेक्षकाने लोखंडी खिळा माझ्या डोळ्यावर मारला. सुदैवाने तो खिळा माझ्या डोळ्याच्या खाली लागला. डोळ्याला लागला असता तर माझा डोळा गेला असता. या प्रकारामुळे सामना दहा मिनिटे थांबवण्यात आला होता. मात्र या घटनेचा आम्ही बाऊ केला नाही.

दुसऱ्यांना सुधरवायचा प्रयत्न करायला जाणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डला इरफान पठाणने या ट्विट मधून चांगले सुनावले आहे. त्याच्या या ट्विट नंतर कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूचे अथवा पीसीबीच्या अधिकाऱ्याची प्रतिक्रिया आली नाही. 2003-04 मध्ये भारताने बऱ्याच वर्षानंतर पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळेस इरफान पठाण सारखे खेळाडू हे आमच्या गल्लीबोळात मिळतात, अशी खोचक टीका जावेद मियांदाद यांनी पठाण वर केली होती. अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या समालोचकाच्या भूमिकेत आहे.

इरफान पठाण

भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये राजकीय संबंध चांगले नाहीत. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवली जात नाही. आयसीसी इव्हेंट्समध्ये मात्र हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध क्रिकेटची सामने खेळताना दिसून येतात.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळेल, असे क्रिकेट प्रेमींना वाटले होते. मात्र भारतीय गोलंदाजापुढे पाकिस्तानचा संघ गडगडून गेला. सामन्यामध्ये पाकिस्तान संघात कुठेही फायटिंग स्पिरिट दिसून आली नाही. यापूर्वी झालेल्या प्रत्येक सामन्यात चुरस पाहायला मिळाली. विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत दोन्ही संघात आठ वेळा सामने झाले आहेत. प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे.


हेही वाचा:

 

Leave A Reply

Your email address will not be published.