क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूला शून्य धावसंख्येवर बाद होणे आवडणार नाही. पण जर तो फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झाला तर त्याच्यासाठी ती गोष्ट अधिक वाईट ठरते. अशा घटना क्रिकेटमध्ये दीर्घकाळ लक्षात ठेवल्या जातात. विश्वचषकात अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. विश्वचषकात काही फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत.
पहिल्याच चेंडूवर बाद होणाऱ्या फलंदाजाच्या यादीत एकूण सहा फलंदाज आहेत. फलंदाजाच्या या यादीमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूचा समावेश नाही, मात्र या यादीमध्ये एका माजी भारतीय प्रशिक्षकाचा समावेश आहे. याविषयी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात
विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद होणारे फलंदाज
जॉन राईट: 1992 साली ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक झाला होता. या विश्वचषकात न्यूझीलंडचे माजी फलंदाज जॉन राईट हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना पहिल्याच चेंडूवर बाद झाले होते. विश्वचषकात पहिल्या चेंडूवर बाद होणारे ते पहिलेच फलंदाज ठरले आहेत. जॉन राईट निवृत्तीनंतर भारताचे दीर्घकाळ प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारत 2003 सालच्या विश्वचषकामध्ये अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता.
हनन सरकार: या यादीमध्ये दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे बांगलादेशचा माजी सलामीवीर ‘हसन सरकार’. दक्षिण आफ्रिकेमध्ये 2003 साली झालेल्या विश्वचषकामध्ये बांगलादेशचा सलामीवीर हसन सरकार हा शून्य धावसंख्येवर पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.
श्रीलंकेचा माझी वेगवान गोलंदाज चमीन्डा वास याने त्याला भोपळाही फोडू न देता माघारी धाडले होते. विश्वचषक स्पर्धेमध्ये शून्यावर बाद होणारा तो पहिला बांगलादेशी खेळाडू आहे त्यानंतर बांग्लादेशचा कोणताही खेळाडू विश्वचषक स्पर्धेमध्ये शून्यावर बाद झाला नाही.
ब्रॅडेंट टेलर : 2011 साली झालेल्या विश्वचषकात कॅनडा विरुद्ध खेळताना झिंबाब्वेचा फलंदाज ब्रॅडेंट टेलर हा शून्यावर बाद झाला. विश्वचषक स्पर्धेमध्ये शून्यावर बाद होणारा तो तिसरा फलंदाज आहे.
मार्टिन: 2019 साली वेस्टइंडीज विरुद्ध वेस्टइंडीज विरुद्ध खेळताना न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज मार्टिन हा शून्य धावसंख्येवर बाद झाला होता. या विश्वचषक स्पर्धेमध्ये जवळपास 4 फलंदाज त्याच्या पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाले होते.

दिमुथ करुणारत्ने: 2019 साली श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज दिमुथ करुणारत्ने साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळताना पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद होणारा तो सातवा तर श्रीलंकेचा दुसरा फलंदाज होता.
लिटन दास: सध्या भारतात सुरू असलेल्या विश्वचषकात बांगलादेशचा फलंदाज लिटन दास हा शून्य धावसंख्येवर बाद होऊन आला तसा माघारी परतला. ट्रेंट बोल्टने त्याला पहिल्याच चेंडूवर बाद केले. विश्वचषक 2023 मध्ये पहिल्याच चेंडूवर बाद होणारा तो एकमेव खेळाडू आहे.
हेही वाचा:
अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..