AFG tour of Zimbabwe: अफगाणिस्तान क्रिकेट संघ पुढील काही दिवसात झिम्बाब्वे दौऱ्यावर (AFG tour of Zimbabwe) जात आहे. जिथे अफगाणिस्तान आणि झिम्बाम्ब्वे एकदिवसीय आणि टी-२० मालिका (AFG vs ZIM ODI & T-20 Series) खेळवली जाणार आहे. या दौऱ्यासाठी अफगाणिस्तान संघाचा घोषणा करण्यात आली आहे.
AFG tour of Zimbabwe: अफगाणिस्तान संघाची घोषणा, रशीद खान कडे कर्णधारपद.
या दौऱ्यासाठी अफगाणिस्तानने रशीद खानकडे टी-२० मालिकेसाठी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर एकदिवसीय मालिकेसाठी हशमतुल्ला शाहिदीला कर्णधारपद देण्यात आले आहे. याशिवाय मुजीब उर रहमानचे दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे.
मुजीब गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय क्रिकेट संघापासून दूर होता. अलीकडेच तो उजव्या पायाच्या इंजरीमधून बरा झाला आहे. याशिवाय देशांतर्गत स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या झुबैद अकबरीलाही प्रथमच राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे.
मुजीबच्या परतल्यावर मुख्य निवडकर्ता अहमद शाह म्हणाले की,
आमचा मुख्य फिरकीपटू मुजीब उर रहमान दुखापतीतून सावरताना आणि निवडीसाठी उपलब्ध असल्याचे पाहून खूप आनंद होतो. तो आमच्या संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे आणि आम्हाला आशा आहे की तो, अफगाणिस्तानसाठी चांगली कामगिरी करत राहील.
ZC moves Afghanistan white-ball fixtures to boost attendance
Details 🔽https://t.co/i1bcrweVpi pic.twitter.com/uKVCt5iOJm
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) November 29, 2024
AFG tour of Zimbabwe सुरुवात 3 सामन्यांच्या T-20 मालिकेने होईल.
3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, तर शेवटचा एकदिवसीय सामना 21 डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी अफगाणिस्तान आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही सहभागी होणार आहे. ज्याचे आयोजन यावेळी पाकिस्तानमध्ये केले जाणार आहे.
झिम्बाम्ब्वे विरुद्ध अफगाणिस्तान T -20 सामने वेळापत्रक ( AFG vs ZIM T-20 series Schedule)
11 डिसेंबर 2024 : पहिला T20I :हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
13 डिसेंबर 2024 : दुसरा T20I हरारे स्पोर्ट्स क्लब,
14 डिसेंबर 2024 तिसरा T20I , हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
झिम्बाम्ब्वे विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवशीय मालिका वेळापत्रक ( AFG vs ZIM ODI Series Schedule)
- 11 डिसेंबर 2024 : पहिली वनडे , हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
- 17 डिसेंबर 2024: दुसरी वनडे ,हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
- 21 डिसेंबर 2024: तिसरी वनडे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
झिम्बाम्ब्वे विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी मालिका वेळापत्रक ( AFG vs ZIM Test match Schedule)
- डिसेंबर 26 – 30, 2024: पहिली कसोटी, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
- जानेवारी 02 – 06, 2025: दुसरी कसोटी क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
झिम्बाम्ब्वे दौऱ्यासाठी अफगाणिस्तानचा टी-20 संघ (Afghanistan squad for AFG vs ZIM T-20 series)
रशीद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), सेदीकुल्लाह अटल, हजरतुल्ला झाझई, मोहम्मद नबी, दरविश रसूल, झुबैद अकबरी, गुलबद्दीन नायब, करीम जन्नत, अजमातुल्ला उमरझाई, नांगेबाल उमरझाई, मुहम्मद उमरझाई रेहमान, नूर अहमद, फजल हक फारुकी, फरीद अहमद आणि नवीन उल हक.
झिम्बाम्ब्वे दौऱ्यासाठी अफगाणिस्तानचा एकदिवशीय संघ (Afghanistan squad for AFG vs ZIM odi series)
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमत शाह (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), अब्दुल मलिक, सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबद्दीन नायब, राशिद खान. नांग्याल खरोती, एएम गझनफर, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, बिलाल सामी, नवीद झदरन आणि फरीद अहम मलिक.
इतर ताज्या घडामोडी:
INDU19 vs PAKU19: पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरला 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशी, काढू शकला फक्त 1 धाव…