ENG vs AFG: अफगाणिस्तानी फिरकीपट्टू पुढे साहेबांनी टेकले गुडघे: पराभव लागला इंग्लंडच्या जिव्हारी..

0

 क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते, याची प्रचिती कालच्या सामन्यात आली. 2023 विश्वचषकाच्या तेराव्या सामन्यात दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताने इंग्लंडला 69 धावनी हरवत पहिला उलटफेअर घडवून आणला. 2019 सालचा गत विजेता राहिलेल्या इंग्लंडच्या संघाला पराभव केल्याने अफगाणिस्तानचा आनंद गगनात मावेनासा झाला. विश्वशाशकातल्या तीन सामन्यापैकी हा इंग्लंडचा दुसरा पराभव आहे. या पराभव मुळे इंग्लंडचा पुढचा रस्ता अवघड बनला आहे.

कालच्या सामन्यात इंग्लंडला त्यांचा आत्मविश्वास चांगलाच लढला दिल्लीची खेळपट्टी ही प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अनुकूल असताना देखील त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तान संघाने धडाकेबाज सुरुवात केली सलामीवीर रहमानूल्लाह गुरबाज याने 80 धावांची तडाकेबाज खेळी केली. तर एकूण तर इकराम अलीखिल याने 58 धावांचे योगदान दिले. अफगाणिस्ताने निर्धारित 50 षटकात सर्व बाद 284 धावा केल्या. इंग्लंडकडून फिरकीपटू आदिल रशीद याने तीन विकेट घेतले.

ENG vs AFG

प्रत्युत्तरात इंग्लंडच्या डावाची सुरुवात ही खराब झाली. अवघ्या तीन धावात इंग्लंडचा पहिला गडी बाद झाला. इंग्लंडचा संघ 40.3 षटकात 215 धावावर सर्वबाद झाला. हॅरी ब्रुक (66) याला सोडले तर एकही फलंदाज 40 पेक्षा जास्त धावा काढू शकला नाही. अफगाणिस्तान कडून राशीद खान आणि मुजीबउर रहमान यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले तर मोहम्मद नबी याला दोन गडी बाद करण्यात यश मिळाले.

अफगाणिस्तानचा विश्वचषक स्पर्धेतला हा दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी 2015 साली स्कॉटलंडला हरवले होते. तसेच सलग 14 पराभवानंतर हा पहिला विजय आहे. तर इंग्लंडच्या संघाचा हा दुसरा पराभव आहे. यापूर्वी सलामीच्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्यांचा पराभव झाला होता.

Eng vs AFG: अफगाणिस्तानी फिरकीपट्टू पुढे साहेबांनी टेकले गुडघे: पराभव लागला इंग्लंडच्या जिव्हारी..

या परभावानंतर इंग्लंडच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. विश्वचषकात पहिल्यांदाच एखाद्या संघातील आठ खेळाडू हे फिरकी गोलंदाजांच्या चेंडूवर बाद झाले आहेत. दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी देखील पहिल्यांदाच एका सामन्यात आठ विकेट घेतले आहेत. यापूर्वी 2019 साली श्रीलंकेच्या विरोधात कार्डीफ मध्ये खेळताना सहा गडी बाद केले होते.

या विजयानंतर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक जॉनथन ट्रॉट  हा भलताच खुश दिसून आला. कारण तो तो इंग्लंडचा माजी खेळाडू आहे. प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू लागला. 2022 पासून तो अफगाणिस्तान संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. या विजयामुळे अफगाणिस्तानचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.


हेही वाचा:

विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

Leave A Reply

Your email address will not be published.