IND vs AUS 2nd test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना (IND vs AUS 2nd test) 6 डिसेंबर पासून ॲडलेड येथे खेळवला जाणार आहे. हा सामना दिवस-रात्र प्रकारात असून सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाईल. एकीकडे ऑस्ट्रेलियन संघ आपल्या खेळाडूंच्या दुखापतींमुळे काहीसा अडचणीत सापडला असतानाच दुसरीकडे आता टीम इंडियासाठीही तणावही काहीसा वाढताना दिसत आहे.
IND vs AUS 2nd test: दुसऱ्या कसटीच्या दोन दिवस विराट कोहली झाला जखमी?
कसोटीच्या दोन दिवस आधी विराट कोहली नेट्समध्ये सराव करताना गुडघ्यावर पट्टी बांधलेला दिसला. त्यामुळे चाहत्यांची चिंताही काहीशी वाढली आहे.विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट गुडघ्यावर पट्टी बांधलेला दिसत आहे.
आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांचे टेन्शन वाढू लागले आहे. विराटला खरोखर दुखापत झाली आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
पहा व्हायरल व्हिडीओ.
Everything okay with Kohli?
courtesy @sports_tak #IndvsAus pic.twitter.com/whAeHkTg1z— Sunny Daud (@sunnyda67155508) December 3, 2024
IND vs AUS 2nd test आधी विराट कोहली जखमी, काय आहे व्हायरल व्हिडीओच सत्य..!
याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून BCCI) अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र, विराटचा हा व्हिडीओ पाहून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे असेच प्रत्यक्षदर्शी दिसत आहे.
मात्र तरीही जर विराट कोहली दुसऱ्या कसोटीमध्ये खेळला नाही तर हा भारताला सर्वांत मोठा धोका ठरू शकतो. कारण हा सामना जिंकला तरच टीम इंडिया WTC च्या अतिंम सामन्यात प्रवेश करू शकणार आहे. त्यामुळे उरलेल्या सामन्यात विराट कोहली संघात असने खूप महत्वाचे आहे.
IND vs AUS पर्थ कसोटीत विराट कोहलीने झळकावले शानदार शतक !
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना पर्थमध्ये खेळला गेला. जो टीम इंडियाने 295 धावांनी जिंकला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात विराट फ्लॉप ठरला, मात्र दुसऱ्या डावात कोहलीने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले.
पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात कोहलीने 143 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली. हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0अशी आघाडी घेतली आहे. विराटकडून दुसऱ्या कसोटीमधेही अश्याच कामगिरीची अपेक्षा भारतीय संघाला आहे.
इतर ताज्या घडामोडी:
INDU19 vs PAKU19: पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरला 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशी, काढू शकला फक्त 1 धाव