IND vs AUS 2nd test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.
आता दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघ प्रधानमंत्री 11 विरुद्ध सराव सामना ( IND vs PMXI Warm up Match) खेळत आहे. पावसामुळे दोन दिवसीय कसोटी सामना 46 षटकांचा खेळवला जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने निराशा केली.
IND vs AUS 2nd test: वार्म अप सामन्यात रोहित शर्मा ठरला अपयशी..
रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. तो ॲडलेडमध्ये होणारा दुसरा सामना खेळणार आहे. पण याआधी रोहितने ऑस्ट्रेलिया पीएम इलेव्हन विरुद्ध सामना खेळला आणि त्यात तो निराशाजनक कामगिरी करताना दिसला.
रोहित शर्माने 11 चेंडूत केवळ 3 धावा केल्या. रोहितचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. यापूर्वी रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेतही त्याच्या बॅटमधून मोठी खेळी झाली नाही. आता ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्याआधी रोहित शर्माने भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं आहे.
Rohit Sharma reminded the management that it is not right to change the winning combination💀 pic.twitter.com/EY8i6OoWqW
— Dinda Academy (@academy_dinda) December 1, 2024
रोहित शर्माची अलीकडची कामगिरी (Rohit sharma earlier test stas)
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहितने 52 आणि 2 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात 8 आणि 0 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात रोहितने 18 आणि 11 धावांची खेळी खेळली. रोहितचा अलीकडचा फॉर्म टीम इंडियासाठी तणावाचे कारण बनला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळल्या जात असलेल्या मालिकेत रोहित शर्मासाठी त्याच्या बॅटमधून मोठी खेळीनिघणे खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा आगामी कसोटी सामन्यात भारताला त्याचे परिणाम भोगावे लागतील. आणि याचे सर्वांत मोठे नुकसान भारताला WTC चा अंतिम सामना खेळण्याची संधी सुद्धा गमवावी लागू शकते, त्यामुळे रोहित शर्मा फॉर्ममध्ये येणे भारतीय संघासाठी खूप महत्वाचे आहे.
इतर ताज्या घडामोडी:
INDU19 vs PAKU19: पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरला 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशी, काढू शकला फक्त 1 धाव…