IND vs AUS pink Ball Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ ॲडलेडमध्ये होणारा दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ॲडलेड कसोटी 6 डिसेंबरपासून गुलाबी चेंडूने (IND vs AUS pink ball test) खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघातील अनेक दिग्गज प्रथमच गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या खेळाडूंमध्ये केएल राहुलच्या नावाचाही समावेश आहे, जो दीर्घकाळ भारताकडून कसोटी खेळत आहे. मात्र आजपर्यंत तो गुलाबी चेंडूने एकही कसोटी सामना खेळू शकलेला नाही.
IND vs AUS pink Ball Test: हे 3 भारतीय खेळाडू पहिल्यांदाच खेळणार पिंक बॉल कसोटी सामना.
1.केएल राहुल (Kl Rahul)
पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या बॅटने शानदार फलंदाजी करणारा केएल राहुल (Kl Rahul)सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. पण राहुल प्रथमच ॲडलेड डे नाईट कसोटी सामन्यातही भाग घेणार आहे.
आपल्या कसोटी कारकिर्दीत ५४ कसोटी सामने खेळणाऱ्या केएल राहुलने आजपर्यंत गुलाबी चेंडूने (pink Ball Test) एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
View this post on Instagram
मात्र, ॲडलेड कसोटी सामन्यापूर्वी राहुलने ऑस्ट्रेलिया पीएम इलेव्हन (IND vs PM11) विरुद्ध गुलाबी चेंडूने सराव सामना खेळला. या सामन्यात राहुलने 44 चेंडूत 27 धावा केल्यानंतर राहुल दुखापतग्रस्त होऊन परतला. मात्र त्यांची दुखापत मोठी नसल्यामुळे तोऑस्ट्रोलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटीत फिट होऊन मैदानात उतरू शकतो..
2. यशस्वी जैस्वाल (Yashashvi Jaiswal)
पर्थ कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावून जैस्वालने (Yashashvi Jaiswal) आपण जगातील कोणत्याही खेळपट्टीवर फलंदाजीसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या जैस्वालने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत गुलाबी चेंडूचा (pink Ball Test) एकही कसोटी सामना खेळलेला नाही. ॲडलेड कसोटीतही तो प्रथमच गुलाबी चेंडूने खेळणार आहे. पर्थ कसोटी सामन्यात जैस्वालने दुसऱ्या सामन्यात 161 धावांची खेळी केली.
3. नितीश कुमार रेड्डी (Nitesh Kumar Reddy)
या यादीत शेवटचे नाव नितीश कुमार रेड्डी (Nitesh Kumar Reddy) यांचे आहे, जे पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भागआहे. . पर्थ कसोटी सामन्यात या युवा अष्टपैलू खेळाडूने त्याचा आवडता खेळाडू विराट कोहलीची पदार्पणाची कॅप घातली होती. या सामन्यात रेड्डीने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने छाप पाडली.
View this post on Instagram
नितीश रेड्डी देखील प्रथमच गुलाबी चेंडूने कसोटी (pink Ball Test) सामना खेळण्यासाठी ॲडलेडला येणार आहेत. आतापर्यंत त्याने 1 कसोटी सामन्यात 79 धावा केल्या आहेत आणि 1 बळीही घेतला आहे.
इतर ताज्या घडामोडी:
INDU19 vs PAKU19: पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरला 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशी, काढू शकला फक्त 1 धाव…