विश्वचषक 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील विश्वचषक स्पर्धेतील सर्वांत मोठा सामना खेळवला जात आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे या सामन्यावर लक्ष असून या सामन्यात कोण बाजी मारते याची सर्वांना उत्सुकता आहे. भारत आणि पाकिस्तान याआधीही विश्वचषकस्पर्धेमध्ये भिडले आहेत. त्याच्यात किती सामने झालेत आणी कुणी किती जिंकले शिवाय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात अनेक विक्रम झाले आहेत या विक्रमांवर आता एक नजर टाकूयात.
सर्वाधिक विजय
भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकात आत्तापर्यंत सात सामने झाले आहेत. या सातही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. यंदाच्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आठव्यांदा भिडतील. वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा भारतावर दबदबा राहिला असला तरी विश्वचषकात मात्र भारत पाकिस्तानला नेहमीच वरचढ ठरला आहे.
सर्वाधिक धावा
विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या आतापर्यंतच्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 6 सामन्यात सर्वाधिक 313 धावा केल्या आहेत. आपल्या कारकिर्दीमध्ये क्रिकेटचे प्रत्येक मैदान गाजवणारा सचिन एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळताना सर्वाधिक धावा करण्यामध्ये तो आघाडीवर आहे.
सर्वाधिक बळी
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम हा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याच्या नावावर आहे. प्रसादने पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक आठ गडी बाद केले आहेत.
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने पाकिस्तान विरुद्ध खेळताना विश्वचषकात सर्वोत्तम वैयक्तिक धावा काढल्या आहेत. 2015 साली ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या विश्वचषकात त्याने ही कामगिरी केली आहे. रोहितने 140 धावांची तडाखेबाज खेळी केली होती.
सर्वोत्तम गोलंदाजी
1996 साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या क्वार्टर फायनल सामन्यांमध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याने 27 धावा देत पाकिस्तानचे पाच महत्त्वपूर्ण बळी टिपले व भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच या सामन्यात अमीर सोहेल बरोबर झालेला वाद देखील अनेक वर्ष चर्चेत राहिला. या सामन्यात अमीर सोहेल ला त्याने सांगून बाद केले होते.

सर्वाधिक षटकार
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या विश्वचषकातील सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा सुरेश रैना याच्या नावावर आहे. सुरेश रैनाने पाकिस्तान विरुद्ध तीन षटकार ठोकलेत.
सर्वाधिक शतक
विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंनी आतापर्यंत प्रत्येकी एक एक शतक ठोकले आहेत. सईद अन्वर, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी एक एक शतक ठोकले आहे.
सर्वाधिक अर्धशतक
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक तीन अर्धशतके ठोकले आहेत. क्रिकेट जगतात दीर्घकाळ अधिराज्य गाजवणाऱ्या सचिनला मात्र विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध खेळताना शतक ठोकता आले नाही.
हेही वाचा:
विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..