IND vs PAK: असे झाल्यास विश्वचषकात क्रिकेट प्रेमींना पुन्हा पाहायला मिळू शकतो भारत-पाकिस्तानचा हाय वोल्टेज सामना

0

 

 IND vs PAK: चेन्नईच्या चेपॉक मैदानावर अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तान संघाला मोठा धक्का दिला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर 8 गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तानने विश्वचषकातील 5 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासह पाकिस्तानचे गुण चार झाले आहेत. या पराभवामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचे पाकिस्तानचे सारेच गणित बिघडून गेले आहे. असे असले तरी भारत आणि पाकिस्तान ( IND vs PAK:)यांच्यात विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळू शकतो.

असे झाले असते तर बाबर आजम देखील विराट कोहली बरोबर भारतीय संघात खेळला असता...!

असे झाल्यास प्रेक्षकांना पहावयास मिळू शकतो  पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK )सामना

भारतीय संघ विश्वचषक 2023  स्पर्धेत 5 सामने जिंकून 10 गुणांसह गुणतालिकेत टॉपवर आहे. यंदाच्या स्पर्धेत सेमी फायनल मध्ये रॉबिन ग्राउंड पद्धतीने सामने होणार आहेत. म्हणजेच गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेला संघ हा चौथ्या स्थानावर असलेल्या संघाशी भिडेल तर दुसऱ्या स्थानावर असलेला संघ तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी दोन हात करताना दिसून येईल. पाकिस्तानात सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी अथक परिश्रमासोबत इतर संघाच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल.

पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर राहिला तर आणि भारतीय संघ पहिल्या स्थानावर राहिला तर या दोन्ही संघात पुन्हा एकदा सामना पाहायला मिळेल. जर भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहिला आणि पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर आला तरी देखील या दोघांमध्ये सामना होऊ शकतो. हे संपूर्ण गणित पाकिस्तानच्या विजयावर अवलंबून आहे. पाकिस्तानचे पुढचे सामने हे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश सारख्या संघाबरोबर होणार आहेत. 

 IND vs PAK पाकिस्तानचा सेमीफायनलचा प्रवास झाला खडतर , तरी उम्मीद कायम.

पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पुढील चारही संघाविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. पाकिस्तान पुढे दक्षिण आफ्रिकेचे तगडे आव्हान असणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तानचा रेकॉर्ड चांगला आहे तर इंग्लंडचा संघ गत चॅम्पियन असला तरी यंदाच्या स्पर्धेत तो लईत खेळताना दिसून येत नाही. त्यामुळे इंग्लंड विरुद्धचा पेपर त्यांना अवघड जाणार नाही. बांगलादेशचा संघ हा दुबळा दिसत असला तरी, कोणत्याही क्षणी हा संघ सामन्याचा निकाल आपल्या बाजूने फिरवण्यात माहीर आहे. वरील सर्व गणित जुळून आल्यानंतरच भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो.

 IND vs  PAK: असे झाल्यास विश्वचषकात क्रिकेट प्रेमींना पुन्हा पाहायला मिळू शकतो भारत-पाकिस्तानचा हाय वोल्टेज सामना

भारत आणि पाकिस्तान ( IND vs PAK) यांच्यात सेमी फायनलचा सामना होणार असेल तर तो सामना कोलकत्ताच्या मैदानावर होईल. जर भारताचा अन्य संघाविरुद्ध सेमी फायनलचा सामना होणार असेल तर तो मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. चाहत्यांना मात्र भारत पाकिस्तान यांच्यात सेमी फायनलच्या सामन्याऐवजी फायनलचा सामना व्हावा, अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास दोन्ही संघांमध्ये एक हाय व्होल्टेज सामना अहमदाबादच्यानरेंद्स्टेर मोदी स्डिटेडियमवर पाहायला मिळेल.

हे जरी एक  अंदाज असला तरी आता भारत पाकिस्तान सामना होईल का नाही याचे संपूर्ण गणित हे पाकिस्तानच्या पुढील सामन्यातील कामगिरीवर अवलंबून असेल. पाकिस्तानचे पुढील सामने हे हे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश सारख्या संघाबरोबर होणार आहेत. 


हेही वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.