India vs Bangladesh 2nd Test: भारत आणि बांगलादेश (ind vs Ban) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूर येथे खेळला गेलेल सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत2-0 अशी आघाडी घेऊन बांगलादेशला मालिकेत 2-0 ने स्वीप दिला आहे.
टीम इंडियाने हा सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Point Table) अंतिम पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान आणखी मजबूत केले आहे दुसरीकडे, डब्ल्यूटीसी अंतिम पॉइंट टेबलमध्ये बरीच गडबड आहे. न्यूझीलंडला हरवून श्रीलंकेचा संघ आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच वेळी, इंग्लंड आणि न्यूझीलंडची स्थिती खूपच वाईट दिसते.
India vs Bangladesh 2nd Test:कानपूर कसोटी जिंकून भारताचा प्रवास फायनलकडे!
कानपूर कसोटीनंतर भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आणखी 8 सामने खेळावे लागणार आहेत. त्यापैकी तीन कसोटी न्यूझीलंडसोबत घरच्या मैदानावर खेळल्या जाणार आहेत. याशिवाय बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला ऑस्ट्रेलियात 5 कसोटी सामने खेळायचे आहेत जे खूप महत्त्वाचे असतील.
India vs Bangladesh 2nd Test: WTC चा अंतिम सामना खेळण्यासाठी भारताला करावे लागणार हे काम..
टीम इंडियाने कानपूर कसोटी जिंकली असून आता डब्ल्यूटीसी फायनलचा मार्ग त्यांच्यासाठी सोपा झाला आहे. त्यानंतर आता भारताला 8 पैकी फक्त 4 सामने जिंकावे लागतील. ज्यानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्वतःचे स्थान निश्चित करेल, त्याला इतर कोणत्याही संघाच्या विजय किंवा पराभवावर अवलंबून राहावे लागणार नाही.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूरमध्ये सुरू असलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला तर भारतासाठी काही समस्या निर्माण होऊ शकतात, त्यानंतर रोहित आणि कंपनीला 8 पैकी 5 सामने जिंकावे लागतील. कारण सामना अनिर्णित राहिला तर भारत आणि बांगलादेशचे प्रत्येकी 4 गुण होतील, पण भारताने सामना जिंकला तर पूर्ण 12 गुण होतील.
अशा परिस्थितीत टीम इंडियाला कानपूर कसोटी जिंकून कोणत्याही किंमतीत 12 गुण मिळवायचे आहेत. त्यामुळे WTC मध्ये टीम इंडियाचे पहिले स्थान आणखी मजबूत होईल. भारतानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा: