मुकेश अंबानी: रिलायन्सचे नाव येताच रिलायन्स जिओ, रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स पेट्रोल पंपांचे चित्र डोळ्यासमोर येते. पण मुकेश अंबानी आंब्याचा व्यवसाय देखील करतात? अस म्हटल तर कमी लोकांचा विश्वास बसेल.
पण होय हे खर आहे. मुकेश अंबानी फक्त आंब्याची शेतीच नाही करत तर जगातील सर्वांत मोठी आंबा बाग असण्याचा विक्रम ही त्यांच्या नावावर आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर मुकेश अंबानी यांच्या या आंब्याच्या बागेबद्दल..
रिलायन्सने वाढवलीय केशर आणि इतर आंब्याची जगातील सर्वांत मोठी बाग.
रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. या कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारत आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्सचा व्यवसाय अनेक भागात पसरलेला आहे. यापैकी पेट्रोलियम, टेलिकॉम आणि रिटेल प्रमुख आहेत.
पण फार कमी लोकांना माहित असेल की रिलायन्स ही जगातील सर्वात मोठी आंबा निर्यातदार कंपनी आहे.कंपनीचे जामनगर, गुजरात येथे आंब्याची बाग (Reliance Mango Farme) आहे जी 7000 एकरांवर पसरलेली आहे, यातील बहुतांश झाडे ही आंब्याची आहेत, त्यात दीड लाखांहून अधिक आंब्याची झाडे आहेत.
या बागेत 200 हून अधिक देशी-विदेशी जातींच्या आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. यापैकी काही जाती जगातील सर्वोत्तम वाणांमध्ये समाविष्ट आहेत.
रिलायन्सने आंबा व्यवसायात कसा केला प्रवेश?
ही गोष्ट 1997 ची आहे. त्यावेळी रिलायन्स आपल्या दुसऱ्या व्यवसायात अग्रेसर होती. मात्र त्यांना एका कारणामुळे आंब्याचा हा व्यवसाय सुरु करावा लागला.
रिलायन्सने स्वेच्छेने आंब्याच्या व्यवसायात प्रवेश केला नाही परंतु तसे करण्यास भाग पाडले. रिलायन्सची गुजरातमधील जामनगर येथे रिफायनरी आहे. ही जगातील सर्वात मोठ्या रिफायनरीपैकी एक आहे. त्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी रिलायन्सने आंब्याची बाग लावली आहे.
प्रत्यक्षात प्रदूषण रोखण्यासाठी कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एकापाठोपाठ एक अनेक नोटिसा मिळाल्या.शेवटी कंपनीला वाटले की प्रदूषणाची समस्या थांबवण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे. यासाठी कंपनीने अनोखे पाऊल उचलले. यामुळे अंबा व्यवसायासह पर्यावरणाचे रक्षणदेखील होत आहे.
जामनगरमध्ये आंब्याचे मळे (Ambani’s Mango Farm in Jamnagar)
कंपनीने रिफायनरीजवळ आंब्याचे मळे उभारण्याचा निर्णय घेतला. कंपनीने 1998 मध्ये जामनगर रिफायनरीजवळील ओसाड जमिनीवर आंब्याची झाडे लावण्याची प्रक्रिया सुरू केली. सुरुवातीला या प्रकल्पाच्या यशाबद्दल अनेक शंका होत्या.
कारण येथे अनेकअडचणी होत्या शिवाय येथील पाणीही खारट होते. जमीनही आंबा लागवडीसाठी योग्य नव्हती. मात्र कंपनीने तंत्रज्ञानाची मदत घेऊन हा प्रकल्प यशस्वी केला.
कंपनीचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या नावावरून या बागेला धीरूभाई अंबानी लखीबाग आमराई (Dhirubhai Ambani Lakhibag amraye ) असे नाव देण्यात आले.ही बाग 600 एकरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेली आहे आणि जगातील सर्वात मोठी आंब्याची बाग मानली जाते.
यासाठीचे पाणी कंपनीच्या डिसॅलिनेशन प्लांटमधून येते. या प्लांटमध्ये समुद्राचे पाणी स्वच्छ केले जाते. पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी, पाणी साठवण आणि ठिबक सिंचन यांसारख्या तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
केसर, अल्फोन्सो, रत्ना, सिंधू, नीलम, आम्रपाली या देशी जातींबरोबरच या बागेत आंब्याच्या विदेशी जातीही आहेत. यामध्ये अमेरिकेतील फ्लोरिडा येथील टॉमी ॲटकिन्स आणि केंट आणि इस्रायलमधील लिली, कीट आणि माया या जातींचा समावेश आहे.
आंब्याच्या बागेतील फळांची निर्यात विदेशात ..
या बागेत पिकवलेला आंबा जगातील अनेक देशांमध्ये निर्यातही केला जातो. रिलायन्स जवळच्या शेतकऱ्यांना त्यांच्या बागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्राची ओळख करून देते आणि दरवर्षी शेतकऱ्यांना एक लाख झाडांचे वाटप करते. अशाप्रकारे हे आपत्तीतील संधीचे उत्तम उदाहरण आहे.
या बागेची कमान मुकेश यांच्या पत्नी नीता अंबानी (nita Ambani) यांच्या हातात आहे. या बागेत पिकवलेल्या आंब्यांना एनआरआय गुजरातींमध्ये जास्त मागणी आहे. शिवाय धीरूभाई अंबानींना सुद्धा आंब्याची खूप आवड होती. मुकेश अंबानी हे स्वतः आंबा प्रेमी आहेत.
तब्बल 7500 एकर वर पसरलेली आहे धीरूभाई अंबानी लखीबाग आमराई!
रिलायन्सची जामनगर रिफायनरी 7,500 एकरमध्ये पसरलेली आहे आणि 1,627 एकरमध्ये हरित पट्टा आहे. येथे 34 हून अधिक प्रकारच्या जातीची झाडे आहेत, त्यापैकी 10 टक्के आंब्याची झाडे आहेत.
आंब्याव्यतिरिक्त या बागेमध्ये पेरू, चिंच, काजू, ब्राझिलियन चेरी, सपोटा, पीच, डाळिंब आणि काही औषधी झाडे आहेत. आंब्याचे प्रति एकर उत्पादन सुमारे 10 मेट्रिक टन आहे जे ब्राझील आणि इस्रायलपेक्षा जास्त आहे.
रिलायन्सने आपल्या बागांमध्ये पिकवलेल्या फळांच्या मार्केटिंगसाठी जामनगर फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड (Jamnagar Farm Pvt Ltd) ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी RIL Mango या ब्रँड नावाने मार्केटमध्ये हे फळे विकण्याचे काम करतात.
इतर ताज्या घडामोडी:
INDU19 vs PAKU19: पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरला 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशी, काढू शकला फक्त 1 धाव