PAK vs AFG: पाकिस्तान झाली उलटफेरचा शिकार; अफगाणिस्तानचा 8 गडी राखून ऐतिहासिक विजय

PAK vs AFG: आयसीसी विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये काल चेन्नईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी इतिहास घडवला. या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा दणदणीत आठ विकेट राखून पराभव केला. या विजयासह अफगाणिस्तानने गुणतालिकेत चार गुणांसह सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

पाकिस्तानने 283 धावांचे विशाल आव्हान अफगाणिस्तान समोर ठेवले होते. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी हे आव्हान 2 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. अफगाणिस्तानने यापूर्वी इंग्लंड सारख्या बलाढ्य संघाचा पराभव या स्पर्धेत केला होता. त्यानंतर काल चेन्नईच्या मैदानावर पाकिस्तानचा पराभव करून त्यांनी दुसरा चमत्कार घडवून आणला.

AFG vs BAN

अफगाणिस्तानने पहिल्यांदाच वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला. पाकिस्तानच्या या पराभवामुळे त्यांचे पुढचे सेमी फायनल मध्ये पोहोचण्याचे रस्ते अवघड झालेत. सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला या पुढचे चारही सामने जिंकावे लागेल, त्यासोबत त्यांना नशिबाची ही साथ हवी आहे.

PAK vs AFG: पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात?

पाकिस्तानने दिलेले 283 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्ल्हा गुरबाज आणि इब्राहिम जादरान यांनी धडाकेबाज सुरुवात केली. दोघांनाही तडाखेबाज सुरुवात करत 130 धावांची सलामी दिली. गुरबाजने 53 चेंडूत 65 धावांची तडाखेबाज खेळी केली. तर इब्राहिमने 87 धावांची शानदार खेळी केली. त्याचे शतक 13 धावांनी हुकले.

गुरबाज पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर इब्राहिमने दुसऱ्या विकेटसाठी रहमत शाहा सोबत 60 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर जादरान हसन अलीच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर रहमत शाहा आणि कर्णधार हसमतुल्लाह यांनी अफगाणिस्तानचा डाव सांभाळला. तिसऱ्या विकेटसाठी त्यांनी 96 धावांची विजयी भागीदारी रचली. पाकिस्तानचा कोणताच गोलंदाज हा लईमध्ये गोलंदाजी करताना दिसून आला नाही. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी हा सामना एकतर्फी केला.

सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात ही खराब झाली. इमाम उल हक्क हा केवळ 17 धावांवर पवेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार बाबर आजम याने अब्दुल शफिक याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी केली. शफिक 58 धावा काढून बाद झाला.जगातला सर्वोत्तम फलंदाज असलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर याने शानदार खेळीचे दर्शन घडत 74 धावांची खेळी केली.

PAK vs AFG

पाकिस्तानकडून मधल्या फळीत खेळताना शेवटच्या काही षटकात शादाब खान आणि इफ्तिकार अहमद यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे पाकिस्तानने 7 बाद 282 धावा करू शकला. इफ्तिकार याने 27 चेंडू ताबडतोब 40 धावा तर शदाब खान याने 40 धावांचे योगदान दिले.


हेही वाचा: