आश्चर्यम! एकही षटकार न ठोकता रोहित शर्माने केले होते शतक

0

प्रत्येक सामन्यात मोठमोठे उत्तुंग षटकार ठोकण्यात माहीर असल्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा हिटमॅन या नावाने प्रसिद्ध झाला. नुकतेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याचा विक्रम केला. यासह त्याने युनिवर्सल बॉस म्हणून ओळखला जाणाऱ्या क्रिस गेलला देखील पाठीमागे टाकले आहे.

रोहित शर्माने अर्धशतक किंवा शतक ठोकले तर त्यात एक तरी षटकाराचा समावेश असतो. मात्र त्याचे असे एक शतक आहे की ज्यात त्याने एकही षटकार न ठेवता शतक ठोकले आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल मात्र हे खरे आहे. 2015 मध्ये इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताचा सामना इंग्लंड विरुद्ध झाला होता.

इंग्लंड विरुद्धच्या या सामन्यात भारताचा निसटता पराभव झाला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने जॉनी बेयरस्टो याचे शतक आणि बेन स्टोक्सच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने 338 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. के एल राहुल हा शून्य धावसंख्येवर माघारी परतला. राहुल बाद होताच रोहितने संयमी खेळीच्या दर्शन घडवले.

रोहितने इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात 109 चेंडूत 102 धावांची शतकी खेळी साकारली होती. यात 15 चौकारांचा समावेश होता. सामन्यात भारतीय संघ विजयाच्या दिशेने आगेकुच करत असताना विराटची विकेट पडली आणि भारताचा डाव गडगडला. यातच संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. रोहित शर्माने शतक ठोकूनही भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही. त्याची ही शतकी खेळी वाया गेली.

2019 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहित शर्माने तब्बल पाच शतके ठोकली होती. एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. अशी दमदार कामगिरी करूनही भारतीय संघाचा सेमी फायनल मध्येन्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पराभव झाला होता. यंदाच्या स्पर्धेत देखील रोहित शर्मा कमालीच्या फार्मात आहे. एक शतक आणि तीन अर्धशतकासह सर्वाधिक धावा काढणारा खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

आयसीसी 2023 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पुढचा सामना 29 ऑक्टोबर रोजी लखनऊच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला 2019 मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची सुवर्णसंधी आपसूकपणे चालून आली आहे. भारताने यंदाच्या स्पर्धेत आपले पाचही सामने जिंकून अंकतालिकेमध्ये संघ पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.