विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या अथवा मधल्या फळीतील फलंदाजांनी अनेक विक्रम रचले आहेत. यात वनडाऊनच्या पोझिशनवर म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांनी देखील धावांचा रतीब घातला आहे. विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा कोणत्या खेळाडूने काढले आहेत याची माहिती पुढील प्रमाणे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग याने विश्वचषक स्पर्धेमध्ये नेतृत्वासोबत फलंदाजीत हि चुणूक दाखवली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 1723 धावा केल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्याच्या या सर्वाधिक धावा आहेत.
श्रीलंकेचा माजी कर्णधार यष्टीरक्षक फलंदाज कुमार संघकारा याने विश्वचषक स्पर्धेत वनडाऊन खेळताना 1174 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंचे यादीमध्ये हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
‘चेसमास्टर’ विराट कोहलीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये सर्वाधिक वेळा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्याने 1161 धावा काढल्या आहेत. आणखीन 13 धावा काढल्या तर तो श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संघकारा त्याला पाठीमागे टाकू शकतो.
दुखापतीमुळे संघाबाहेर राहिलेला न्युझीलँडचा कर्णधार केन विलियम्सन याने तिसऱ्या क्रमांकावर 890 धावा केले आहेत. यंदाच्या स्पर्धेत पहिल्या 3 सामन्यांना तो दुखापतीमुळे मुकला आहे. पुढील सामन्यात खेळणार की नाही याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नाही.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसीस तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विश्वचषक स्पर्धेत 762 धावा केले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून गेल्या वर्षी निवृत्ती घेतली आहे. मात्र तो जगभरातल्या T20 लीग मध्ये खेळत असतो.
ऑस्ट्रेलियाचा स्टायलिश धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ यांनी 693 धावा काढल्या आहेत. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये ऑस्ट्रेलिया संघाकडून तिसऱ्या क्रमांकावरच खेळला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस याने विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 691 धावा काढल्याची नोंद आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याने विश्वचषक स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 681 धावा केल्या आहेत. यंदाचा पाकिस्तान संघ सेमी फायनल पर्यंत देखील पोहोचू शकला नाही.
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट हा देखील या यादीत नवव्या स्थानावर आहे. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 631 धावा केल्या आहेत.
बांगलादेशचा कर्णधार शाकिब उल हसन याच्या नावावर 606 धावांची नोंद आहे. तो या यादीत दहाव्या स्थानावर आहे. यंदाच्या स्पर्धेत त्याला फारशी चांगली चमकदार कामगिरी करता आली नाही.