Who is Richest cricketer in the world: क्रिकेटमध्ये जेव्हा ब्रँड व्हॅल्यूची (Brand Value) चर्चा होते तेव्हा सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली यांची नावे घेतली जातात.
हे दिग्गज त्यांच्या पिढीतील महान क्रिकेटपटू मानले जातात. पण, तुम्हाला माहीत आहे का की यापैकी कोणीही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू (Richest cricketer in the world) नाही?
मग तो खेळाडू कोण आहे, ज्याने या दिग्गजांनाही श्रीमंतीच्या बाबतीत मागे सोडले आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. चला तर आम्ही तुम्हाला सांगतो की कोण आहे जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेटपटू ?( Who is Richest cricketer in the world?)
Who is Richest cricketer in the world?: कोण आहे जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेटपटू ?
जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेटपटू होण्याचा मान आर्यमन बिर्ला( Aryaman Birla) यांच्याकडे आहे, जो प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम (Kumar Manglam Birla) बिर्ला यांचा मुलगा आहे. आता आर्यमन 2023 मध्ये आदित्य बिर्ला समूहाच्या फॅशन आणि रिटेल विभागात संचालक म्हणून सामील झाला आहे.
शिवाय तो ग्रासिम इंडस्ट्रीज आणि आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळावरही आहेत. मात्र, आज तो त्याच्या व्यवसायामुळे चर्चेत आहे. पण, एक काळ असा होता जेव्हा आर्यमन क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहत होता. त्याने क्रिकेट क्षेत्रात पदार्पण सुद्धा केले होते. चला पाहूया कशी होती त्याची क्रिकेट कारकिर्द (Aryaman Birla Cricket Carrer)
आर्यमन बिर्ला यांची क्रिकेट कारकीर्द (Aryaman Birla cricket career)
आर्यमनचा जन्म जुलै 1997 मध्ये मुंबईत झाला. त्याचा क्रिकेटमधील प्रवास मध्य प्रदेशातून सुरू झाला. त्याने 2017 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये ओडिशाविरुद्ध पदार्पण केले आणि पहिल्या सामन्यात त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. पण, 2018 मध्ये ईडन गार्डन्सवर बंगालविरुद्ध खेळताना त्याने नाबाद 103 धावा केल्या होत्या. या खेळीने त्याला एक कुशल फलंदाज म्हणून ओळख मिळवून दिली.
आर्यमन बिर्लाचे आयपीएल करिअर (Aryaman Birla IPL career)
आर्यमन बिर्लाच्या कामगिरीच्या जोरावर आर्यमनला 2018 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल करार मिळाला. मात्र, दोन हंगाम संघाचा भाग असूनही तो एकही सामना खेळू शकला नाही.
2019 मध्ये, दुखापती आणि मानसिक दबावामुळे, त्याने क्रिकेटमधून “अनिश्चित काळासाठी ब्रेक” घेण्याचा निर्णय घेतला. आणि नंतर पुन्हा त्याने काही दिवसातच क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली.
आपली क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतांना आर्यमनने इंस्टाग्रामवर लिहिले होते की,
“मी आतापर्यंत प्रत्येक तणावाचा सामना केला आहे, परंतु आता मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे. “मला स्वतःला चांगले समजून घ्यायचे आहे आणि नवीन गोष्टी शिकायच्या आहेत.”
किती आहे क्रिकेटर आर्यमन बिर्ला यांची ऐकून संपत्ती? (Aryaman Birla Net Worth)
क्रिकेट सोडल्यानंतर आर्यमन त्याच्यावडिलोपार्जित व्यवसायात उतरला. आणि व्यवसायाचे धागेदोरे स्वतः सांभाळले आता त्याची ऐकून संपत्ती ही जवळपास 70,000 कोटी रु एवढी आहे. 2024 च्या त्याच्या कंपनीच्या माहितीनुसार त्याची एका वर्षाची कमाई ही 1600 कोटी रु एवढी आहे .
इतर ताज्या घडामोडी:
INDU19 vs PAKU19: पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरला 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशी, काढू शकला फक्त 1 धाव