World Cup 2023: यंदाच्या विश्वचषकात या 4 संघाचे नेतृत्व करताहेत यष्टीरक्षक खेळाडू..

World Cup 2023: 2023 विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघानी सहभाग नोंदवला आहे. 5 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आतापर्यंत 22 सामने झाले आहेत. बहुतांश संघाचे नेतृत्व हे फलंदाजाच्या हाती सोपवले असते. मात्र यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत चार असे खेळाडू आहेत जे की यष्टीरक्षणासोबत संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. 4 यष्टिरक्षक फलंदाज हे एखाद्या विश्वचषक स्पर्धेत संघाचे नेतृत्व करताहेत ही पहिलीच वेळ आहे.

World Cup 2023: यंदाच्या विश्वचषकात या 4 संघाचे नेतृत्व करताहेत यष्टीरक्षक खेळाडू..

 जोस बटलर: 2019 मध्ये विजेता ठरलेला इंग्लंडचा संघ यंदाच्या स्पर्धेत सपाटून मार खात आहेत. या संघाच्या नेतृत्वाची धुरा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पण बटलरच्या नेतृत्वाखाली संघाने म्हणावी तशी कामगिरी केली नाही.मागील विश्वचषक स्पर्धेत इयान मॉर्गन हा संघाचा कर्णधार होता.

स्कॉट एडवर्ड्स : नेदरलंड संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्कॉट एडवर्ड्स हा खेळाडू सांभाळत आहे. विशेष म्हणजे स्कॉट हा देखील एक यष्टीरक्षक फलंदाज आहे. अत्यंत चपळाईने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळणारा स्कॉट हा अत्यंत चतुर कर्णधार मानला जात आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली नेदरलंड संघाने दक्षिण आफ्रिकेचा या विश्वचषक स्पर्धेत पराभव केला होता. स्फोटक फलंदाज म्हणून ख्याती असलेल्या या खेळाडूने सध्याच्या वनडे विश्वचषक स्पर्धेत दोन वेळा अर्धशतकी खेळी केली आहे.

केन विल्यम्सन: विश्वचषक तोंडावर असताना केन विल्यम्सन हा न्यूझीलंडचा कर्णधार दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे आपसूकच नेतृत्वाची जबाबदारी ही यष्टीरक्षक फलंदाज टॉम लेथम याच्या खांद्यावर येऊन पडली. टॉम हा नियमित स्वरूपाचा कर्णधार नाही. मात्र केन हा दुखापतग्रस्त असल्याने त्याला ही जबाबदारी सांभाळावी लागत आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या संघ चांगली कामगिरी करत आहे. वनडे विश्वचषक स्पर्धेतील 5 पैकी 4 सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.

केन विल्यम्सन

कुशल मेंडीस: श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका हा विश्वचषक स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्यामुळे नेतृत्वाची संपूर्ण जबाबदारी ही यष्टीरक्षक फलंदाज कुशल मेंडीस यांच्याकडे देण्यात आली. कुसल हा नियमित स्वरूपाचा कर्णधार नाही. त्याच्याकडे केवळ अनुभव असल्यामुळे ऐनवेळी त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वनडे क्रिकेटमध्ये एक स्फोटक फलंदाज म्हणून त्याने नाव कमविले आहे.

महेंद्रसिंग धोनी: 2011 मध्ये भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत एक अनोखा योगायोग पाहायला मिळाला. भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. या स्पर्धेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावर होती तर श्रीलंका संघाच्या नेतृत्वाची कमान ही यष्टीरक्षक फलंदाज कुमार संघकारा याच्याकडे सोपवली होती. विशेष म्हणजे हे दोघेही यष्टीरक्षक फलंदाज आहेत. एखाद्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन यष्टीरक्षक फलंदाजांनी नेतृत्व करतानाचा असा हा योगायोग पहिल्यांदाच घडून आला.


हेही वाचा: