न्यूझीलंड नाही तर ‘या’ संघाकडून टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये धोका, भारताला करू शकतो विश्वचषकातून बाहेर..

टीम इंडिया

 

टीम इंडियाला सेमीफायनल: क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच ICC क्रिकेट विश्वचषक २०२३ भारतीय भूमीवर खेळवला जात आहे. घरच्या परिस्थितीत ही स्पर्धा खेळणाऱ्या टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत चांगलीच राहिली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला पराभूत करून पहिले तीन सामने जिंकले आहेत.

टीम इंडियाचे सुरवातीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून,  तर अफगाणिस्तानचा 8 गडी राखून आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. या जबरदस्त कामगिरीनंतर भारतीय संघ विश्वचषक २०२३ च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

टीम इंडिया

रोहित आणि कंपनी आणि इतर संघांची कामगिरी पाहता, विश्वचषक 2023 च्या गट टप्प्यातील सामने संपल्यानंतर पॉइंट टेबल कसा असेल याचा अंदाज लावणे अगदी सोपे झाले आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये पहिल्या क्रमांकावर राहील. त्याचवेळी न्युझीलंड संघाचेदुसरे स्थान निश्चित दिसते.

यावरून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत बाद फेरीत किवी संघाकडून झालेल्या पराभवाची बरोबरी टीम इंडियाला करता येणार नाही.

  सेमीफायनल उपांत्य फेरीचे समीकरण काय सांगते?

विश्वचषक २०२३ राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवला जात आहे, त्यानुसार गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पहिल्या उपांत्य फेरीत, प्रथम क्रमांकाचा संघ चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाचा सामना करेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघ दुसऱ्या उपांत्य फेरीत खेळतील.

वर्ल्ड कप 2023 : इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर कर्णधार रोहीत शर्मा, बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित मोडू शकतो हा मोठा विक्रम..

सध्याच्या पॉइंट टेबलनुसार टीम इंडिया आणि न्यूझीलंड ग्रुप स्टेज संपल्यानंतर अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहू शकतात. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेचे स्थानही निश्चित दिसते. मात्र, चौथ्या क्रमांकासाठी चुरशीची स्पर्धा होऊ शकते. अश्या स्थितीमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांचा सामना झालाच तर तो अंतिम सामन्यात होऊ शकतो. आता हा विश्वचषक कोण जिंकतो? हे पाहणे रंजक ठरणार आहे