बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघाला मोठा धक्का..! सामनावीर खेळाडू दुसऱ्या कसोटीमधून होणार बाहेर…
बांगलादेश आणि भारत यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळला गेला ज्यात टीम इंडियाने हा सामना 188 धावांनी जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता या मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरला ढाका येथे होणार आहे. दरम्यान, भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडल्याची बातमी समोर आली आहे.
या सामन्याच्या आधीच भारतीय संघासाठी एक मोती बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा कसोटी कर्णधार रोहित शर्माहा पहिल्या कसोटीत खेळला नव्हता. बांग्लादेश विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात रोहित झेल घेतांना जखमी झाला होता. तेव्हपासून तो बांग्लादेशमधून पुन्हा भारतात आला आणि उपचार घेत होता.
Rohit Sharma will miss the Second Test match against Bangladesh. (According to Cricbuzz)
— CricketMAN2 (@ImTanujSingh) December 19, 2022
दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा संघात पुनरागमन करेल असा अंदाज सर्वच जण लावत होते. शिवाय खुद बीसीसीआयने रोहित शर्मा दुसऱ्या टेस्ट साठी बांगलादेशला येईल, असा अंदाज लावला होता. पण प्रत्यक्षात मात्र वेगळच झालंय.
रोहित दुसऱ्या कसोटीतून पडू शकतो बाहेर.
पहिली कसोटी संपल्यानंतर टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुस-या कसोटीतून पुनरागमन करू शकतो, असे वृत्त समोर आले होते. खुद बीसीसीआयने याला पृष्टी दिली होती.

मात्र आता कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात येऊ शकते. दरम्यान रोहित अजूनही मुंबईमधेच असुन तो उपचार आणि इतर टेस्ट करत आहे. डॉक्टरांनी रोहित शर्मा साध्याच कसोटी सामना खेळण्यासाठी फिट नसल्याचे म्हटले आहे. ज्यामुळे रोहित दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही, हे जवळपास निच्चीत झालय.
बीसीसीआयने जरी आजून यावर काही अपडेट्स दिले नसले तरीही स्वतः रोहितच्या पत्नीनेही इंस्ताग्रामवरती रोहितच्या तब्येतीची माहिती दिली आहे. याच आधारे रोहित दुसरा कास्ति सामना खेळू शकणार नाही, असं म्हटल जातंय. बीसीसीआय लवकरच त्याच्या खेळण्यावरील पडदा उघडू शकेल.
हेही वाचा:
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…