आयपीएलमध्ये स्फोटक फलंदाजी करून शतक ठोकलेले ‘हे’ 2 फलंदाज आजपर्यंत भारतीय संघासाठी एकही टी-20सामना खेळू शकले नाहीयेत, बीसीसीआयने कायम केलंय नजरंदाज..!

आयपीएलमध्ये स्फोटक फलंदाजी करून शतक ठोकलेले ‘हे’ 2 फलंदाज आजपर्यंत भारतीय संघासाठी एकही टी-20सामना खेळू शकले नाहीयेत, बीसीसीआयने कायम केलंय नजरंदाज..!
क्रिकेटचा थरार एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाणारी आयपीएल नवीन प्रतिभावान खेळाडू तयार करण्यासाठी देखील ओळखली जाते. येथे, आपल्या खेळात सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना राष्ट्रीय संघात आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली आहे. क्रुणाल पंड्या, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन ,श्रेयस अय्यर, यांसारखे अनेक स्टार खेळाडू हे आयपीएल मधूनच देशासाठी क्रिकेट खेळू शकले आणि आज स्टार खेळाडू झालेत.
मात्र दुसरीकडे काही असेही खेळाडू आहेत जे आयपीएल मध्ये तर जबरदस्त फलंदाजी करून स्टार झाले . असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये शतक झळकावून चांगली कामगिरी केली आहे. मात्र, त्याला राष्ट्रीय संघात आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळू शकली नाही. आज आपण अश्याच दोन खेळाडूंबद्दल बोलणार आहोत, ज्यांची टी-२० कारकीर्द केवळ आयपीएल पुरतीच मर्यादित राहिलीय.
1. वृद्धिमान साहा (wriddhiman saha) : 2008 पासून आयपीएलचा भाग असलेला रिद्धिमान साहा सध्या गुजरात संघासाठी यष्टिरक्षक फलंदाजाची भूमिका बजावत आहे. सर्वात कठीण परिस्थितीतही संघाला बाहेर काढण्याची त्याची क्षमता ही त्याला इतर फलंदाजांपेक्षा वेगळ बनवते. संघासाठी अनेकवेळा उत्कृष्ट खेळी करणाऱ्या साहाने आयपीएलमध्ये विकेटच्या मागे ८५ बळी घेतले आहेत.

त्याने कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि आता सनरायझर्स हैदराबादसाठी एकूण 126 सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर 8 अर्धशतकं आणि एक नाबाद शतक आहे. आयपीएलमधील टी-20 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या या खेळाडूने भारतीय संघासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही, हे त्याचं दुर्देवचं म्हणावे लागेल.
2. मयंक अग्रवाल (mayank agarwal: देशांतर्गत 154 टी-20 सामन्यांमध्ये 24 वेळा 50+ धावा करणारा टॉप-ऑर्डर फलंदाज मयंक अग्रवालने आयपीएलमध्येही अप्रतिम खेळी खेळली आहे. आयपीएलच्या 14व्या आवृत्तीत अनेक उत्कृष्ट खेळी खेळणाऱ्या अग्रवालने केवळ 7 सामन्यात 260 धावा केल्या होत्या. तो मध्येच थांबवला नसता तर त्याच्याकडून आणखी मोठ्या खेळी पाहता आल्या असत्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली डेअरडेव्हिल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि आता पंजाब किंग्जचा भाग असलेल्या मयंक अग्रवालने गेल्या आवृत्तीत पंजाबसाठी सलामी करताना दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले. आयपीएलमध्ये अनेकदा संघासाठी गोलंदाज बनलेल्या मयंकला त्याची फलंदाजी पाहून एकही आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळण्याची संधी मिळालेली नाहीये.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…