बेन स्टोक्सच्या येण्याने चेन्नई सुपर किंग्समध्ये झालेत जगातील सर्वांत सर्वश्रेष्ठ असे हे 3 अष्टपैलू खेळाडू, आयपीएल 2023ची ट्रॉफी जिंकून धोनीला देणार आनंदाने निरोप..
चार वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स कर्णधार एमएस धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम संस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. फ्रँचायझीची ही तयारी आयपीएलच्या लिलावातही दिसून आली. जिथे फ्रँचायझीने आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू जोडले.
म्हणूनच चेन्नईने महेंद्रसिंह धोनी यांना शेवटचा आयपीएल हंगाम ट्रॉफी जिंकूनच शेवट गोड करण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. म्हणूनच चेन्नईच्या मालकांनी मजबूत संघ बांधणीला सुरवात देखील केली आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अश्याच 3 अष्टपैलू खेळाडू बद्दल सांगणार आहोत ज्यांना संघात घेतल्यामुळे चेन्नई हा हंगाम जिंकून ट्रॉफीही धोनीच्या हातात देऊ शकतात.

बेन स्टोक्स:
यामध्ये सर्वात प्रमुख नाव बेन स्टोक्सचे होते, ज्यांच्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने 16.50 कोटी रुपये खर्च केले आणि इंग्लंडचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आपल्या संघात समाविष्ट केला. बेन स्टोक्स आता चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. ज्यांच्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने 16.5 कोटी रुपये खर्च केले.
बेन स्टोक्स चेन्नईसाठी पहिल्यांदा खेळणार आहे तर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली तो दुसऱ्यांदा खेळणार आहे. याआधी 2017 मध्ये तो धोनीच्या नेतृत्वाखाली रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला होता.
बेन स्टोक्सच्या आगमनाने, चेन्नई सुपर किंग्जकडे आता तीन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत. संघात आता बेन स्टोक्स, मोईन अली आणि रवींद्र जडेजासारखे अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहेत. संघाच्या या तिन्ही अष्टपैलू खेळाडूंमध्ये कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करण्याची ताकद आहे.
बेन स्टोक्सच्या आगमनाने, संघ आता मोईन अली, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स आणि ड्वेन प्रिटोरियस यांना जास्त वेळ फलंदाजीस संधी देऊ शकेल. या सर्व खेळाडूंमध्ये कोणत्याही परिस्थितीत संघासाठी सामना जिंकून देण्याची क्षमता आहे.
अनुभवी अष्टपैलू मिळून असा असेल चेन्नईचा संघ: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, बेन स्टोक्स, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), काइल जेमिसन, दीपक चहर, मुकेश चौधरी आणि तुषार देशपांडे