रणजी ट्रॉफीमधील हे 4 विक्रम आजपर्यंत कोणताच खेळाडू मोडू शकला नाहीये, 3 नंबरचा विक्रम मोडणे तर आहे जवळपास अशक्यच..
कोणत्याही क्रिकेटपटूसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोहोचण्याची पहिली पायरी म्हणजे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतरच क्रिकेटपटू आपल्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकतो.
रणजी करंडक ही भारतातील अशीच एक स्पर्धा आहे. जिथे क्रिकेटपटू चांगली कामगिरी करून भारतीय संघाच्या निवडकर्त्यांसमोर राष्ट्रीय संघात सामील होण्याचा दावा मांडतो. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातही असे अनेक विक्रम झाले आहेत जे मोडणे जवळपास अशक्य आहे. आजच्या या लेखात आपण अश्याच काही विक्रमांबद्दल जाणून घेणार आहोत, जे मोडणे जवळपास अशक्य आहे.
1. रणजीच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज.
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात दिल्लीकडून खेळताना फिरकीपटू बिशनसिंग बेदीने एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. बिशन सिंग बेदी यांनी 1974-75 च्या एका रणजी हंगामात एकूण 64 विकेट घेतल्या होत्या. हा विक्रम आजतागायत अबाधित आहे.
विशेष म्हणजे, भारताचा अनुभवी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने रणजी ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक धावा केल्या आहेत. 1999-2000 च्या रणजी हंगामात लक्ष्मणने 1415 धावा केल्या होत्या. आजही तो मोडणे फार कठीण वाटते. त्याच्या आसपास दुसरा खेळाडू दिसत नाही.
2. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतके
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम वसीम जाफरच्या नावावर आहे. जाफरने त्याच्या रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एकूण 36 शतके झळकावली आहेत जो एक विक्रम आहे. इतकंच नाही तर रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा वसीम जाफर देखील आहे.
वसीमने रणजी ट्रॉफीच्या इतिहासात १२०३८ धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम मुंबईकडून खेळणाऱ्या अमोल मजुमदारच्या नावावर होता. मजुमदारने रणजीच्या इतिहासात ९२०२ धावा केल्या होत्या. अमोल मुझुमदार भारतीय संघाकडून खेळू शकला नाही.
3. सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम राजिंदर गोयलच्या नावावर आहे. राजिंदर गोयलने आपल्या संपूर्ण रणजी कारकिर्दीत एकूण 750 विकेट घेतल्या. राजिंदर गोयल यांचे नुकतेच निधन झाले. राजिंदर गोयलने आपल्या रणजी ट्रॉफी कारकिर्दीत चांगली कामगिरी केली पण भारतीय संघात ते कधीही स्थान मिळवू शकले नाहीत. त्याचा विक्रम मोडण्याच्या जवळही कोणी नाही. त्यामुळे त्याला महान म्हटले जाते. नुकतेच त्यांचे निधन झाले.
4. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम.
रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम बी.बी.निंबाळकर यांच्या नावावर आहे. बी.बी. निंबाळकर यांनी महाराष्ट्राकडून खेळताना 1948 साली काठियावाड विरुद्धच्या 4 दिवसीय रणजी सामन्यात 443 धावांची खेळी केली होती.
क्रिकेटच्या इतिहासात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर आहे. लाराने 1994 मध्ये डरहमविरुद्ध 501 धावांची नाबाद खेळी खेळली होती. हनिफ मोहम्मदने 499 तर ब्रॅडमनने 1930 मध्ये क्वीन्सलँडविरुद्ध 452 धावा केल्या होत्या.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…