क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी आणि लेख वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फोलो करायला विसरू नका..
===
रिषभ पंतला परत परत संघात संधी देऊन टीम इंडियाचे प्रशिक्षक या 3 खेळाडूंचे करिअर बरबाद करतायेत..
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने १-० ने मालिका जिंकली. टीम इंडियाने मालिका जिंकली असली तरी या संपूर्ण मालिकेत संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची कामगिरी फारच खराब होती.
पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता पण भारताने दुसरा सामना 65 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. या सामन्यात डावाची सुरुवात करताना पंतला 13 चेंडूत केवळ 6 धावा करता आल्या. त्याचवेळी नेपियरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पुन्हा एकदा ऋषभ पंतची बॅट नि:शब्द राहिली.
या सामन्यात त्याच्या बॅटमधून केवळ 5 चेंडूत केवळ 11 धावा निघाल्या. खराब फॉर्ममध्ये असूनही पंतला सतत संधी दिली जात आहे, तर असे तीन खेळाडू आहेत ज्यांची कारकीर्द त्याच्यामुळे उद्ध्वस्त होत आहे.
View this post on Instagram
रिषभ पंतमुळे या 3खेळाडूंचे करिअर होतंय बरबाद..
१)शुभमन गिल: शुभमन गिलने टीम इंडियासाठी वनडे आणि टेस्ट फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे, परंतु त्याला अद्याप टी-20 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. शुभमन गिलचा न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही.
या मालिकेसाठी ईशान किशनसह ऋषभ पंतला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली आहे, मात्र शुभमन गिलला बेंचवर ठेवण्यात आले आहे.या दौऱ्यावर पंत केवळ १७ धावा करू शकला होता. गिलबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, तरीही त्याला एकाही सामन्यातही संधी देण्यात आली नाही.
View this post on Instagram
२)संजू सॅमसन: संजू सॅमसनकडे भारतीय निवड समितीने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे पण त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तेच पाहायला मिळाले. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंतला सतत संधी दिली जात आहे पण संजू सॅमसनला एकाही सामन्यात खेळवण्यात आले नाही.
संजूच्या गेल्या पाच सामन्यातील कामगिरीवर नजर टाकली तर त्याने 1 अर्धशतकी खेळीसह एकूण 179 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, पंतची पाच सामन्यांतील कामगिरी पाहिली तर, त्याने एकाही सामन्यात ३० पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. त्याच्या बॅटने गेल्या 5 सामन्यांमध्ये 27, 3, 6, 6 आणि 11 अशा एकूण 53 धावा केल्या आहेत. या कामगिरीकडे पाहता ऋषभ पंतला संधी देऊन निवड समिती आपला आणि संजू सॅमसनच्या करिअरचा वेळ वाया घालवत असल्याचे बोलले जात आहे.

३)पृथ्वी शॉ: 2018 साली अंडर-19 विश्वचषक जिंकणारा कर्णधार पृथ्वी शॉमध्ये टीम इंडियाला सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचे मिश्रण पाहायला मिळते. त्याचबरोबर रोहित शर्माप्रमाणे तो षटकारही मारतो. असे असूनही, आतापर्यंत पृथ्वी शॉला केवळ 1 टी-20 सामन्यात संधी देण्यात आली आहे.
मात्र, त्या सामन्यात त्याच्या बॅटमधून एकही धाव निघाली नाही. 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात संधी दिल्यानंतर त्याला आतापर्यंत दुसरी संधी देण्यात आलेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी खराब फॉर्ममध्ये असलेल्या ऋषभ पंतला निवड समितीकडून सतत संधी दिली जात आहे, पण पृथ्वी शॉने देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करूनही त्याला एकही संधी दिली जात नाही.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…