आयपीएल मधील खराब कामगिरीमुळे या 3 खेळाडूंची भारतीय संघातून होऊ शकते हकालपट्टी, संपूर्ण हंगामात केलंय सर्वांत वाईट प्रदर्शन..
आयपीएल मधील खराब कामगिरीमुळे या 3 खेळाडूंची भारतीय संघातून होऊ शकते हकालपट्टी, संपूर्ण हंगामात केलंय सर्वांत वाईट प्रदर्शन..
आयपीएल 2023 आता रोमांचक टप्प्यामध्ये आले आहे. यंदा अनेक खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली, तर अनेक खेळाडूंनी आपल्या संघाचीही निराशा केली. या मोसमात फलंदाजांसह गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. अशा परिस्थितीत आजच्या लेखात आपण त्या खेळाडूंबद्दल बोलणार आहोत ज्यांना भरपूर अनुभव असूनही यावर्षी निराशाजनक कामगिरी करताना दिसले आणि आपल्या संघासाठी काहीही विशेष अशी कामगिरी करु शकले नाही. याच कामगिरीमुळे त्यांचे आता टीम इंडियातील स्थान सुद्धा धोक्यात आलं आहे.
या खेळाडूंकडून अशा कामगिरीची अपेक्षा नसली तरी त्यांनी अतिशय लाजिरवाणी कामगिरी केली. त्यांची अलीकडची कामगिरी पाहता त्याला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. या यादीत दोन फलंदाज आणि एका वेगवान गोलंदाजाच्या नावाचा समावेश आहे.चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते खेळाडू..
आयपीएल मध्ये खराब कामगिरी करून हे 3 खेळाडू टीम इंडियाची जागा गमवू शकतात.
रोहित शर्मा (Rohit Sharm
आयपीएलमधील टीम मुंबई इंडियन्सला 5 वेळा विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्माची बॅट यावेळी खूपच शांत होती. आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये रोहित शर्माला आपली बॅट दाखवता आलेली नाही. त्याने आतापर्यंत केवळ एकच अर्धशतक झळकावले आहे. याशिवाय त्याने संघाला निराश करण्याचे काम केले आहे, त्याची अलीकडची कामगिरी पाहता त्याला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. रोहित शर्माने 10 सामन्यात 18.40 च्या सरासरीने 184 धावा केल्या आहेत. रोहित शर्माचा स्ट्राईक रेटही विशेष राहिला नाही. त्याने केवळ 126.90 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे.
दीपक हुड्डा (Dipak Hudda)
2022 साली आपल्या बॅटने धुमाकूळ घालणारा मधल्या फळीतील फलंदाज दीपक हुडा यंदा त्याच्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. दीपक हुडाने गेल्या वर्षी लखनौकडून खेळताना अनेक सामने स्वबळावर जिंकले होते, मात्र यावेळी त्याची कहाणी वेगळी असल्याचे दिसून येत आहे. संघ जिंकणे तर दूरच, यावेळी दीपक स्वत: त्याच्या बॅटने धावा करण्यात अपयशी ठरत आहे. दीपक हुड्डा यांनी आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्यात त्याने 6.63 च्या सरासरीने केवळ 53 धावा केल्या आहेत. दीपकची सर्वोत्तम धावसंख्या १७ धावा आहे.
अर्शदीप सिंग (Aeshdeep singh)
पंजाब किंग्जच्या घातक गोलंदाजांपैकी एक अर्शदीप सिंग यावेळी चांगलाच महागात पडत आहे. यावेळी अर्शदीपने विकेट घेण्यात चांगल्या गोलंदाजांना मागे टाकले असले तरी या काळात त्याने अनेक धावाही लुटल्या आहेत. अर्शदीपने 10 सामन्यांत 9.80 च्या इकॉनॉमी रेटने 16 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, मागील हंगामाबद्दल बोलायचे तर, त्याने 7.70 च्या इकॉनॉमी रेटने धावा केल्या होत्या. त्याची अलीकडची कामगिरी पाहता त्याला टीम इंडियात स्थान मिळवणे कठीण जात आहे.