टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर हे 3 स्टार खेळाडू कधीही दिसणार नाहीत भारतीय संघात…
भारतीय क्रिकेटने आजवर अनेक खेळाडू घडवले आहे. भारतीय संघाकडून खेळताना अनेक खेळाडूंना धन्यतेची अनुभूती झाली आहे. भारतीय संघात स्थान प्राप्त करणे हे पाहिजे तेवढे सोपे नाही. अनेक आव्हाने पेलत आणि सातत्यानी, चिकाटीने परिश्रम घेत राहून स्वतःला जणू चढत्या निखाऱ्यावर तापवून सिद्ध करावे लागते. अनेक परिश्रमाने स्वतःला सिद्ध केल्यानंतर आपण भारतीय संघात कायम राहू याची मात्र काही शाश्वती नसते. कारण तिथे अनेक खेळाडू येतात, एका कालावधी आपली चमक दाखवतात आणि नंतर गायब होतात. आपण लगेच संघात स्थिर होऊन असे नसते. त्यात नशिबाचीही साथ लागते.
भारतीय संघाचा जर विचार केला तर आकडा काढतो म्हटलं तर हजारो खेळाडू आपल्याला आपल्या क्रिकेट संघात आढळेल. क्रिकेटची सुरुवात ही आपल्या इथे फार पूर्वी झाली आहे. असे म्हणतात की, इंग्रज राजवटीत हा खेळ आपल्या इथे रूढ झाला आणि स्थिरावला. मात्र भगवान श्रीकृष्णाच्या द्वापार युगात क्रिकेट हा खेळ असेल असे वाटते.

कारण यमुना नदीतील नागाच्या फनावरचे कृष्णाचे नृत्य जे आहे त्यामागच्या कथेतून क्रिकेटचे काही अवशेष सापडतात. असो! त्यामुळेच क्रिकेट हा खेळ भारतीयांसाठी काही नवीन नव्हे. पण इंग्रज काळात क्रिकेटची सुरुवात झाली असे समजून चालल्यास तेव्हापासून आतापर्यंत क्रिकेट खेळाडूंचा आकडा पाहतो म्हटलं तर तो जवळपास लाखाला स्पर्श केलेला असा मोठा असेल.
अनेक खेळाडू आले आणि अनेक खेळाडू गेले. काहींची नावे प्रेक्षकांच्या स्मरणात आहे तर काही येऊन पालापाचोळ्यासारखे उडून गेले. उडून गेलेल्या खेळाडूंची यादी सुद्धा खूप मोठी असेल. अलीकडच्या काळात विचार केला तर काही खेळाडू नजरेत येतात, की जे दमदार पद्धतीने भारतीय संघात प्रवेश करते झाले पण पुरेशे उभरण्याच्या आधीच त्यांचे परतीचे प्रवास सुरू झाले. त्यामध्ये आम्ही अशा ३ खेळाडूंची माहिती आपल्याला देणार आहोत.
View this post on Instagram
१) ईशांत शर्मा : भारताचा जलद गतीने बॉलिंग करणारा बॉलर म्हणजे ईशांत शर्मा होय. शारीरिक उंची पुष्कळ लाभलेली असल्यामुळे बॅट्समनला याला फेस करताना अनेक अडचणी यायच्या. हा जलद गतीने बॉलिंग करायचा. त्यानी अनेक बॅट्समनला पवेलियनचा रस्ता दाखवला आहे. मात्र ईशान शर्मा मोठे रेकॉर्ड स्वतःच्या नावावर करण्याच्या क्षमतेचा असूनही त्याला तसे रेकॉर्ड आपल्या नावे करता आले नाही.
कारण त्याला पुढे खेळण्याची संधीच मिळाली नाही. ऐन प्रगतीपथावर असताना ईशानला दुखणे उद्भवले. आणि त्यामुळे तो सराव करू शकला नाही. त्यामुळे त्याला फारसे सामन्यांमध्ये घेता आले नाही. त्याच्या दुखण्यातून तो पुढे कधीच पूर्णपणे सावरू शकला नाही. आणि त्यामुळे हळूहळू त्याच्या घसरणीला सुरुवात झाली. आज तो वापस येईल अशी कुठलीही चिन्हे दिसत नाही.
२) केदार जाधव : आयपीएल मधून नावारूपात आलेला उजव्या हाताने बॅटिंग करणारा केदार जाधव हळूहळू वर येत होता. म्हणून त्याला भारतीय निवड समितीने अनेकदा संधी देखील दिली. आता दिलेल्या संधीचे सोने करण्यात केदार जाधव अपयशी ठरत गेला. आणि अशा प्रकारे हळूहळू तो निवड समितीच्या मनातून उतरत केला. आज त्याची अशी स्थिती आहे की त्याला आयपीएल मध्ये घेण्यासाठी सुद्धा अनेक लोकं काना-डोळा करतात.
३) विजय शंकर : धडाकेबाज ओपनिंग साठी प्रसिद्ध विजय शंकर हा टेस्ट मॅच सुद्धा चांगला खेळायचा. अंगभूत कौशल्य होतेच पण कारण माहिती नाही हा सुद्धा दिलेल्या संधीचे सोने करण्यात फारसा यशस्वी ठरला नाही. काही नवीन प्रयोग किंवा ताकदीचा सराव असं करताना विजय शंकर कमी पडला आणि त्यामुळेच की काय निवड समितीच्या अपेक्षेवर तो खरा उतरू शकला नाही. आणि हळूहळू हळूहळू संघातून बाहेर फेकल्या गेला.
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..