बॉलीवूड

आयपीएल गाजवलेले हे 5 दिग्गज खेळाडू आयपीएल 2023 मध्ये दिसणार नाहीत मैदानात, एकाचे तर आहेत आयपीएलमध्ये सर्वोत्तम आकडे!

आयपीएल गाजवलेले हे 5 दिग्गज खेळाडू आयपीएल 2023 मध्ये दिसणार नाहीत मैदानात, एकाचे तर आहेत आयपीएलमध्ये सर्वोत्तम आकडे!


आयपीएल 2023 साठी संघांनी कायम ठेवलेल्या आणि रिलीज केल्लेल्या खेळाडूंची यादी काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आली   होती. मिनी लिलावासाठी खेळाडूंची नोंदणी करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2022 होती. 1 डिसेंबर रोजी, IPL आयोजकांनी पुष्टी केली की कोची येथील आगामी लिलावासाठी 991 खेळाडूंनी त्यांची नावे नोंदवली आहेत. या लीलावत अनेक दिग्गज खेळाडू आहेत तर काही दिग्गज चेहरे यंदाच्या आयपीएलचा आणि या मिनी लीलावाचा भाग नसणार आहेत.

मिनी लिलावात उतरलेल्या 991 खेळाडूंपैकी 714 भारतीय आहेत, तर 277 परदेशी नावे आहेत. IPL 2023 लिलावापूर्वी सोडण्यात आलेले जवळपास सर्व भारतीय खेळाडू लिलावासाठी  उपस्थित आहेत. तर या वर्षी आयपीएल करार गमावलेल्या पाच परदेशी खेळाडूंनी आपली नोंदणी केलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by IPL (@iplt20)

या यादीमध्ये, आम्ही 2022 मध्ये आयपीएल करार मिळविलेल्या,2023आधी रिलीझ झालेल्या आणि आयपीएल 2023 च्या लिलाव यादीतून गायब झालेल्या पाच खेळाडूंबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. चला तर मग सुरवात करूया..

#1 किरॉन पोलार्ड :  मुंबई इंडियन्सने पोलार्डला संघातून रिलीज केले आणि  मुंबई इंडियन्सचा (MI) माजी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने कायम ठेवण्याच्या घोषणेच्या दिवशीच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. पोलार्ड 2010 ते 2022 पर्यंत एमआयसाठी खेळला. मागील हंगामात तो संघर्ष करत होता आणि त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले होते.

फलंदाज म्हणून जरी सोबत नसला तरीही पोलार्ड आता मुंबईच्या फलंदाजांना फलंदाजीचे कौशल्य शिकवणार आहे. एमआयने त्याला आगामी हंगामासाठी आयपीएलमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलार्डने निवृत्त होऊन मुंबई इंडियन्स संघात फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली.

#2 ड्वेन ब्राव्हो : आयपीएल 2023 मध्ये नसलेल्या दिग्गज खेळाडूंपैकी दुसरा खेळाडू म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचा ‘ड्वेन ब्राव्हो’

ड्वेन ब्राव्हो हा आयपीएलच्या इतिहासातील 183 विकेट्ससह सर्वाधिक  विकेट घेणारा गोलंदाज आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे माजी अष्टपैलू खेळाडू IPL 2023 लिलावासाठी कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत स्थान दिले नाही. आनी तो संघाच्या बाहेर फेकला गेला.

 

View this post on Instagram

 

A post shared by IPL (@iplt20)

मिनी लिलावात CSK त्याला कमी किमतीत पुन्हा साइन करेल असे अनेक चाहत्यांना वाटले. मात्र, काल ब्राव्होने निवृत्ती जाहीर केली. CSK ने आता IPL 2023 साठी बॉलिंग कोच म्हणून त्यांची निवड केली आहे.

#3 सॅम बिलिंग्स: 
सॅम बिलिंग्स गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळला होता. खेळण्याच्या सातत्यपूर्ण संधी न मिळाल्याने तो प्लेइंग इलेव्हनमध्ये होता आणि बाहेरही होता. बिलिंग्सने या वर्षाच्या सुरुवातीला ट्विटरवर जाहीर केले की, तो आयपीएल 2023 मध्ये सहभागी होणार नाही. त्याच्या माघारीचे कारण आजूनही त्याने स्पष्ट केले नाही.

#4 पॅट कमिन्स : .पॅट कमिन्स हा आणखी एक खेळाडू आहे ज्याने गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले होते परंतु त्याने IPL 2023 मधून बाहेर राहणे पसंद केल आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू IPL 2022 मध्ये चर्चेचा विषय बनला होता कारण, त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध स्पर्धेच्या इतिहासातील संयुक्त-जलद अर्धशतक ठोकले होते.

आयपीएल

अॅशेससाठी स्वत:ला नवीन ठेवण्यासाठी कमिन्स आयपीएल 2023 वन खेळण्याचा निर्णय घेतला. तो ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार आहे आणि त्यांची इंग्लंडविरुद्धची मालिका १६ जूनपासून सुरू होणार आहे.

#5 अॅलेक्स हेल्स: IPL 2022 मध्ये इंग्लंडचा फलंदाज अॅलेक्स हेल्सला KKR ने करारबद्ध केले होते. त्याने स्पर्धेत भाग घेतला नव्हता. यंदाच्या टी-20 क्रिकेटमधील त्याचा उत्कृष्ट फॉर्म लक्षात घेता, कोलकाताने त्याला आयपीएल 2023 साठी कायम ठेवण्याचा विचार केला मात्र कायम ठेवण्याच्या दिवशी, KKR ने घोषित केले की हेल्स वैयक्तिक कारणांमुळे IPL 2023 साठी अनुपलब्ध आहेत.

म्हणुनच वरील 5 खेळाडूंना आयपीएल 2023 मध्ये चाहते नक्की मिस करणार, एवढ मात्र नक्की..!


हेही वाचा:

“बेशक संजू सैमसन अच्छा प्लेयर है,पर” शिखर धवनने बताया आखिर क्यू नही मिला संजू को मौका..

क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

न्यूझीलंड विश्वचषकमधून बाहेर तर फेकला गेला मात्र, कर्णधार ‘केन विल्यमसन’ जाता जाता भारताच टेंशन वाढवणार वक्तव्य करून गेलाय..

या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button