‘महेंद्रसिंग धोनी’ कर्णधार झाल्यामुळे या 5 खेळाडूंना झाला सर्वांत जास्त फायदा, धोनीने सर्वाना बनवले स्टार क्रिकेटर..
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महेंद्रसिंह धोनी एकटा असा कर्णधार आहे ज्याने आयीसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अत्यंत कुल बनून खेळला आणी त्याचाच फायदा त्याच्या सोबत असणाऱ्या संघातील इतर खेळाडूंना देखील झाला.धोनी भारतीयकर्णधारापैकीचं नाही तर जगभरातील कर्णधारांच्या यादीतील सर्वांत पहिला खेळाडू आहे.
धोनीच्या कारकिर्दीत असे अनेक युवा खेळाडू होते जे धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघामध्ये खेळले. यातील अनेक युवा खेळाडूंनी तर धोनीलाच आपला गुरु माणून संघात खेळण्यास सुरवात केली आहे. आज आपण अश्याच काही स्टार खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचं करिअर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात सातव्या आसमानवर पोहचले होत..
View this post on Instagram
धोनीच्या नेतृत्वात खेळतांना रैनाला धोनीच्या अनुभवाचा खूप फायदा झाला.
एका मुलाखतीत स्वतः रैना म्हणाला होता की, जर माझ्या सोबत धोनी नसला असता तर कदाचित मी क्रिकेटमध्ये एवढ्या पुढे येऊ शकलो नसतो. यावरूनच दोघांमध्ये किती जवळीकता होती हे समजून येईल. बेशक धोनीने दिलेल्या सल्ल्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे सुरेश रैना आज स्टार क्रिकेटर होऊन बसलाय.

युवराज सिंह:भारतीय क्रिकेट संघाचा पूर्व अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा देखील धोनीच्या नेतृत्वात बरेच वर्ष क्रिकेट खेळला आहे. युवराजने आपल्या जबरदस्त प्रदर्शनाने 2011चा विश्वचषक जिंकण्यातही महत्वाची भूमिका बजावली होती. युवराज आपल्या आयुष्यात धोनीला मेंटोर मानतो. क्रिकेटमध्ये आपण जे काही धोनीकडून शिकलंय ते कदाचितचं दुसऱ्या एखाद्या खेळाडू कडून शिकायला मिळालं असत, असं युवराज एका मुलाखतीतम्हणाला होता. धोनीच्या नेतृत्वात खेळतांना अनेक वेळा आपण धोनीला युवराजला सल्ले देतांना पाहिलंय. युवराजच्या अश्या अनेक खेळ्या आहेत ज्या क्वचितच एखादा भारतीय क्रिकेट चाहता विसरेल..
केदार जाधव: भारतीय संघाचा माजी खेळाडू केदार जाधव ही या यादीमध्ये आहे.धोनी कर्णधार असतांना जाधवला अनेक वेळा भारतीय संघात संधी देण्यात आली. जाधवनेही आपलं काम योग्यपणे बजावत संघाच्या विजयात वाटा उचलला. परंतु धोनी जेव्हापासून रिटायर झाला तेव्हापासून जाधव भारतीय संघातून बाहेर पडलाय. युवराज सिंह प्रमाणेच केदार जाधवनेही धोनीच्या नेतृत्वात अनेक गोष्टी शिकल्यात. त्याच्या मते धोनी एकमात्र असा खेळाडू आहे जो आपला अनुभव आणि ज्ञान इतरांना न संकोच करता वाटतो. 37 वर्षीय केदार जाधवने आजूनही क्रीकेटमधून निवृत्ती घेतलेली नाहीये. परंतु भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या त्याच्या आशा आता जवळपास संपुष्टात आल्यात.
हार्दिक पांड्या:सध्याचा भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानेही धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघात पदार्पण केलं होत. हार्दिक आणि धोनी यांच्यातील अनेक संभाषण आपण मैदानावर पाहिलेत. धोनीला पांड्या आपला आदर्श मानतो,असं त्याने स्वतः “कॉफी विथ करण “कार्यक्रमात सांगितल होत. धोनीच्या अनुभवामुळे पांड्यालाही खूप काही शिकायला मिळालं आहे.
यांच्यातील आता जवळपास पांड्या सोडला तर सर्वच खेळाडू अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेऊन बसले आहेत.कधीतरी घरेलू क्रिकेट आणि आयपीएलमध्ये य्हे खेळतांना दिसतात. मात्र धोनीच्या मदतीने यांनी क्रिकेटच्या मैदानावर यशाचे षटकार ठोकलेत, हे मात्र नक्की..
हेही वाचा:
या 5 गोलंदाजांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वांत जास्त ‘नो बॉल’ फेकलेत…
या महिलेने हिटलरच्या तावडीतून 25000 ज्यू वंशाच्या मुलांची सुटका करून त्यांना नवजीवन दिले होते..