- Advertisement -

क्रिकेट इतिहासातील तो सामना जेव्हा एका षटकात 77 धावा झाल्या होत्या, जाणून घ्या सामन्याचा निकाल काय लागला.

0 3

 

 

 

क्रिकेट हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय असलेला दुय्यम स्थानी असलेला खेळ आहे. अनेक दिग्गज खेळाडू प्रत्येक देशाकडे आहेत आणि काही न मोडणारी रेकॉर्ड सुद्धा काही फलंदाजांनी बनवली आहेत.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या सामान्या बद्दल सांगणार आहे ज्यांनी चक्क 1 ओव्हर मध्ये 77 धावा केल्या होत्या, साहजिकच आतापर्यंत आपण 6 बॉल 6. सिक्स असा रेकॉर्ड ऐकला किंवा बघितला असेल, जाणून घ्या नक्की सामन्याचे विस्तार काय होते.

 

1990 साली फेब्रुवारी महिन्यात एका देशांतर्गत क्रिकेट सामना खेळला गेला होता, त्या सामन्यात 6 बॉल 77 धावा हा अविश्वसीय विक्रम झाला होता . शेल ट्रॉफीचा अंतिम सामना हा फेब्रुवारी 1990 मध्ये क्राइस्टचर्च आणि वेलिंग्टन यां दोन संघात खेळला गेला होता.

 

या सामन्यात वेलिंग्टनच्या संघाने चांगली कामगिरी करत क्राइस्टचर्चला विजयासाठी 291 धावांचे लक्ष्य दिले होते. पण क्राइस्टचर्चचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्याची सुरुवात चांगली झाली नाही. अत्यंत खराब फलंदाजी झाल्यामुळे या संघाची वाटचाल ही पराभवाच्या दिशेने सुरू होती.

 

क्राइस्टचर्च या संघाच्या 8 विकेट अवघ्या 196 धावांत पडल्या होत्या आणि संघ हरण्याची शक्यता दाट होती. मग वेलिंग्टन संघाच्या कर्णधाराने विचार केला की विरोधी संघाच्या फलंदाजांना मोठे फटके खेळायला का भडकवू नये. जेणेकरून तो लवकर आऊट होतील आणि संपूर्ण संघ बाहेर पडेल. यासाठी वेलिंग्टन संघाच्या कर्णधाराने आपला फलंदाज बर्ट व्हॅन्सला बोलावले ज्याने यापूर्वी कधीही गोलंदाजी केली नव्हती.

 

 

बर्ट व्हॅन्स गोलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा क्राइस्टचर्चला विजयासाठी 12 चेंडूत 96 धावा करायच्या होत्या. पण नंतर एक चमत्कार घडला ज्याची कोणालाही कसलीच अपेक्षा नव्हती. बर्ट व्हॅन्सने ओव्हर टाकायला सुरुवात केली त्या ओव्हर मध्ये फलंदाजांनी 77 धावा बनवल्या या ओव्हर मध्ये आठ षटकार आणि सहा चौकारही मारले गेले होते. शेवटच्या षटकात क्राइस्टचर्चला विजयासाठी 18 धावांची गरज होती. मात्र 17 धावाच होऊ शकल्या आणि त्यामुळे सामना अनिर्णित राहिला.

Leave A Reply

Your email address will not be published.