चक्क दोन्ही हात नसतानाही हा क्रिकेटर करतो जोरदार फलंदाजी आणि गोलंदाजी.
जर तुमच्यात काही करण्याची हिंमत असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि सलगतेने तुमचे काम करत राहाल तर सगळं काही शक्य आहे. लहानपणापासून तुम्हीही अशी अनेक व्यक्तिमत्त्वे पाहिली असतील, जे शरीराने अपंग असले तरीही आपली चमक जगभर पसरवली. अशी अनेक माणसे आपल्या समाजात उदाहरण आहेत, ज्यांच्यावर देवाने अन्याय केला असे आपल्याला वाटते. पण तीच व्यक्ती जेव्हा एखाद्या टप्प्यावर पोहोचते तेव्हा आपण चकित होतो.

भारताचे स्वर्ग म्हणवल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये आमिर नावाचा तरुण राहतो. त्याची कहानी पाहून तुम्ही त्याला नक्कीच सलाम कराल. खरंतर आमिरचं पहिलं आणि शेवटचं प्रेम म्हणजे क्रिकेट आणि बॅट त्याची प्रेयसी. आमिरला त्याचे प्रेम पूर्ण करायला हात नाही. होय, ज्या हाताने बॅट धरली जाते. आता हाताशिवाय कोणी फलंदाजी कशी करणार. तुम्हांलाही माझ्यासारखाच प्रश्न पड़ला असेल. पण हा सगळा विचार करण्याआधी आमिर हात नसतानाही शानदार फलंदाजी करतो हे जाणून घ्यायला हवे.
आमिरला लहानपणापासूनच क्रिकेटर व्हायचे होते, पण अपघातानंतर त्याचे हे स्वप्न स्वप्नच राहिले आणि त्याचवेळी त्याचे भविष्यही धोक्यात गेले आमिरचे वडील क्रिकेटच्या बॅट्सबनवण्याचे काम करायचे. आमिरच्या वडिलांनी आमिरच्या उपचारासाठी जे जे शक्य आहे ते केले . पण यश आले नाही.
शिक्षण पूर्ण करून आमिरने समाजात नाव कमावले आणि अपंग असूनही त्याने पुन्हा एकदा क्रिकेटच्या दिशेने पाऊल टाकले. आता आमिर 27 वर्षांचा आहे आणि तो जम्मू-काश्मीर राज्याच्या पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. फलंदाजी करताना अमीर बॅट खांद्यावर आणि मानेमध्ये ठेवतो आणि पायाने गोलंदाजी करतो, तसेच पायाने चेंडू फेकतो.
हे पाहता या क्रिकेटपटूच्या शौर्याला सलाम करायला हवा. अलीकडेच, आमिरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि लोक त्याच्या धैर्याला आणि जिद्दीला सलाम करतात.