क्रिकेट हा जरी आपला राष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या देशात हॉकी पेक्षा क्रिकेटचे वेड लोकांमध्ये जास्त आहे. आपल्या देशात लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत लोकांना चांगलेच क्रिकेट चे वेड आहे.

आपला राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे परंतु आपल्या देशात अनेक लोकांना हॉकी खेळाडूंची नावे सुद्धा माहीत नाही. यावरूनच आपल्याला समजते की आपल्या देशात लोकांमध्ये क्रिकेट चे वेड किती आहे. आपल्या देशातील तरुणाई मध्ये क्रिकेट चे वेड मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातले त्यात आयपीएल चे तर सर्वात जास्त.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे जे 5वर्षानंतर आपल्याला आयपीएल मध्ये खेळताना दिसणार आहेत.
रिले रूसो:-
रिले रूसो हा दक्षिण आफ्रिका संघाचा अत्यंत आक्रमक असा फलंदाज आहे याच्या आधी तो आपल्याला 2015 साली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून खेळताना दिसला होता.
यंदाच्या आयपीएल लिलावासाठी त्याने आपली स्वतःची base किंमत ही 2 कोटी ठेवली आहे. तसेच रिले हा फलंदाज सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याला कोणता संघ निवडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
रिले रूसो यांच्या आयपीएल करियर बद्दल सांगायचे झाले तर आतापर्यंत आयपीएल मध्ये 5 सामने खेळून 53 धावा काढल्या आहेत.
डेविड विसे:-
डेविड विसे हा खेळाडू 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाकडून खेळत होता. तसेच यंदा च्या वर्षी आयपीएल मध्ये खेळण्यासाठी त्याने आपली मूळ किंमत ही 1 कोटी रुपये ठेवली आहे. तसेच डेविड विसे हा एक उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज देखील आहे.
आयपीएल करियर बद्दल बोलायचे झाले तर 15 सामन्यांमध्ये 127 धावा काढल्या आहेत. तसेच 15 सामन्यांमध्ये 16 फलंदाज आऊट केले आहेत.
ट्रैविस हेड:-
ऑस्ट्रेलिया मधील खेळाडू ट्रैविस हेड हे यंदा च्या वर्षी आपल्याला आयपीएल मद्ये दिसू शकतात. 2017 साली ट्रैविस हेड हे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाकडून खेळत होते. तसेच यंदा च्या वर्षी आयपीएल मध्ये खेळण्यासाठी ट्रैविस हेड ने स्वतःची मूळ किंमत ही 2 करोड रुपये ठेवली आहे.
हेडच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 10 सामने खेळले आहेत आणि 138.51 च्या स्ट्राइक रेटने 205 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याचे एक अर्धशतक आहे.