- Advertisement -

महेंद्रसिंग धोनीच्या पावलावर पाऊल ठेवून ‘या’ युवा खेळाडूने घेतला मोठा निर्णय, क्रिकेट खेळण्यासाठी आता केला या गोष्टीचा त्याग..

0 2

महेंद्रसिंग धोनीच्या पावलावर पाऊल ठेवून या युवा खेळाडूने घेतला मोठा निर्णय, क्रिकेट खेळण्यासाठी आता केला या गोष्टीचा त्याग..


भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याने क्रिकेटच्या आवडीमुळे रेल्वेसारख्या प्रतिष्ठित खात्याची सरकारी नोकरी सोडली होती हे तर सर्वांनाच माहीत आहे.पण तुम्हाला माहीत आहे का क्रिकेट जगतात आणखी एक उगवता तारा आहे. , ज्याने क्रिकेट खेळण्यासाठी चक्क आपली सरकारी नोकरी सोडली आह. होय वाचून विश्वास बसणार नाही मात्र हे खरंय सरकारी नोकरी सोडून हातात बॅट धरणाऱ्या या खेळाडूची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत.

आम्ही बोलतोय त्या उगवत्या क्रिकेटपटूबद्दल, ज्याला भारतीय रेल्वेची नोकरी सोडून क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित करणं योग्य वाटलं.त्याचं नाव आहे ‘अमित गौतम (Amit Goutam). होय गौतमने आपले क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चक्क सरकारी नोकरी सोडली आहे.

महेंद्रसिंग धोनी

मात्र, रेल्वेची नोकरी सोडणे त्याला महागात पडले आहे आणि त्यांना ८.५९ लाख रुपये बाँड म्हणून भरावे लागले. आता हा युवा खेळाडू राजस्थान रणजी संघाचा सदस्य झाला आहे.

आग्रा (Aagra) येथील रहिवासी असलेल्या अमित गौतमला ((Amit Goutam)) 1800 ग्रेड पेसह ईशान्य रेल्वेमध्ये खलासी पदावर नोकरी मिळाली. तेथून तो रजा घेऊन राजस्थानच्या दिशेने गेला आणि तेथून अंडर-22 मध्ये खेळताना अनेक शानदार खेळी खेळल्या.

यानंतर तो परतला आणि ‘येथे नीट सराव करण्याची संधी मिळत नाही’ असे सांगत रेल्वेचा राजीनामा दिला.  

राजस्थानमध्ये 22 वर्षांखालील गटात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या अमितची रणजीसाठी राज्याच्या मुख्य संघात निवड झाली. राजस्थानकडून खेळणाऱ्या या युवा क्रिकेटपटूने हंगामातील पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात असाधारण फलंदाजी करत शतक झळकावले आणि क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केले.

महेंद्रसिंग धोनी

रेल्वेची नोकरी सोडल्यावर काय म्हणाले रेल्वे अधिकारी ? घ्या जाणून..

दरम्यान, ईशान्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी संजय यादव (Sanjay Yadav) यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की,

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे विभाग सदैव तत्पर असतो. या अंतर्गत, त्यांना क्रीडा कोट्यात नोकरी देखील दिली जाते, तथापि, जर कोणी पूर्वसूचना देऊन रेल्वेची नोकरी सोडली तर त्याला बाँडनुसार रक्कम जमा करावी लागेल.

म्हणूनच आता गौतमला नोकरी  तर गमवावी लागलीच आहे शिवाय त्याला जवळपास 9 लाख रुपये सुद्धा रेल्वे खात्यात जमा करावे लागणार आहेत. मात्र आपली क्रिकेटची आवड जोपासण्यासाठी आणी क्रिकेटला फुल टाईम करिअर करण्यासाठी तो ही जोखीम पत्करण्यास सुद्धा तयार झाला आहे.

महेंद्रसिंग धोनी

त्याची क्रिकेटची आवड पाहता तो धोनीच्या पावलावर पाउल ठेवून आपलं नशीब आजमावतोय, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.


हेही वाचा:

आकाश चोपडाने केले महेंद्रसिंग धोनी चे कौतुक, धोनीची कामगिरी पाहून आकाश ने मांडले मत

Leave A Reply

Your email address will not be published.