आनंद महिंद्राचे एक ट्वीट आणि सोशल मिडियावरील संपूर्ण नेटकर त्यांच्या फोटोला टोप्या लावायला लागलेत..
महिंद्रा उद्योग समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा हे नेहमीच सोशल मिडियावर आपल्या भन्नाट ट्वीट साठी ओळखले जातात. अनेक सोशल मिडिया वापरककर्ते हे आनंद महिंद्रा यांना दररोज कोणत्याना कोणत्या पोस्ट मध्ये टेग करत असतात.
सध्या सोशल मिडीयावर अशीच एक पोस्ट खूप पसरत आहे. ज्यामध्ये एका वापरकर्त्याने महिंद्रा उद्योग समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांच्या फोटोला फोटोशॉप करून टोपी बसवली आणि तो फोटो ट्वीट करत त्यात आनंद महिंद्रा यांना मेन्शन केले आहे.
सोशल मिडीयावर हा फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. जेवढा हा फोटो भारी आहे तेवढाच या फोटोवर आनंद महिंद्रा यांनी दिलेली प्रतिक्रियाही भारीय. आनंद महिंद्रा यांच्या त्या प्रतिक्रियेमुळे सोशल मिडीयावर आता अनेक लोक आनंद महिंद्रा यांच्या फोटोला टोपी घालून पोस्ट करत आहेत.
जाणून घेऊया नक्की काय आहे प्रकरण?

आनंद महिंद्रा यांचा महिंद्रा ग्रुप हा लवकरच अमेरिकेमध्ये रेडीओ सेवा सरू करणार आहे. त्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध युट्युब चॅनेल “द काऊबॉय चॅनेल’ यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत लिहले की, आनंद महिंद्रा हे आधीपासून घोडेरेस मध्ये स्वारस्य बाळगून आहेत आणि आता लवकरच ते रेडीओ मध्ये स्पर्धा करणार आहेत.
आपल्या या व्हिडीओमध्ये त्यांनी आनंद महिंद्रा यांचा उल्लेख हॉर्स रायडर असा केला. ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. हे लक्षात आल्यावर आनंद महिंद्रा यांनी त्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देतांना लिहले की, मी हॉर्स रायडर तर नाही पण जर कुणी माझ्या घोड्याजवळील फोटोला टोपी घालून फोटोशॉप केले तर मात्र मी हॉर्स रायडर वाटू शकतो.
आनंद महिंद्रा यांचे हे ट्वीट सुद्धा सोशल मिडीयावर व्हायरल झाले आणि लोकांनी चक्क त्यांच्या फोटोला वेगवेगळ्या टोप्या घालून घोड्याजवळ उभे असल्याचे दाखवले. काही वेळातच हजारो लोकांनी असे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले. त्यामुळेच सध्या आनंद महिंद्रा चर्चेचा विषय बनलेत..
हा आहे व्हायरल व्हिडीओ
Go get ‘em Cowboys…
And perhaps this will be the introduction of this uniquely American sport to 1.4bn Indians! https://t.co/v46N29lK0E— anand mahindra (@anandmahindra) November 17, 2022
आनंद महिंद्रा यांच्या ट्वीट नंतर लोकांनी एडीट केले भन्नाट फोटो.
Now there’s an idea… Will do that. But I’m sure someone will be also go ahead and morph a cowboy hat onto my photo..🙄 https://t.co/1wBXH7uL0h
— anand mahindra (@anandmahindra) November 17, 2022
I think thar will be much apt for you pic.twitter.com/Zr0wdwQ3lH
— Chanchalguda Warden (@AlwaysRamChiru) November 17, 2022
Aye, Aye Captain 🤠🤠 pic.twitter.com/agZ83MfhKm
— HIMANSHU BARIA (@Himanshu_Baria_) November 17, 2022
@anandmahindra Here We Go 💫🙌 pic.twitter.com/0NYx0g5hoH
— Vitthal Narayankar (@SsnVlogs) November 18, 2022
How about this 🤠 pic.twitter.com/iFpFu20ngU
— HIMANSHU BARIA (@Himanshu_Baria_) November 17, 2022
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…