स्वतःची प्रयोगशाळा त्यात हजारो जातीचे झाडे, हा युवा शेतकरी हायटेक शेती करून लाखो रुपये कमावतोय..

असं म्हटले जाते की जर शेतकरी शेती ही पावसाच्या भरोशावर करतो. आणि ते खरेही तेवढेच आहे. मात्र सध्या तांत्रिकदृष्ट्या आपला भारत देश खूप पुढे गेला आहे. त्यातच भारताने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत अनेक गोष्टी आता सोप्या केल्या आहेत. तरीही बर्याच शेतकर्यांना जर पाऊन झाला नाही तर शेतीमध्ये नुकसान सहन करावे लागते.
यावर उपाय म्हणूनच आता आपल्या देशात काही शेतकरी हेओर्गानिक आणि हायड्रोपोनिक्सच्या मदतीने शेती करतांना दिसून येत आहेत.याचं तंत्रज्ञानाच्या मदतीने एका शेतकऱ्याने आपली शेती करून लाखो रुपये कमावले आहेत. आजच्या या शेतीविशेष लेखात आपण त्याच शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत,आणि जाणून घेणार आहोत की नक्की काय आहे ही हायड्रोपोनिक्स शेती पद्धत..
बिहारमध्ये राहणारा अनिल कुमार हा कोरडवाहू शेतकरी त्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली नव्हतीपरंतु त्याने आता अशी शेती केली आहे की ती पाहून तुम्हीही त्याचे कौतुक कराल. अनिलने जवळपास त्याच्या 35एकर शेतीमध्ये हजारो जातींचे झाडे लावली आहेत.ज्यात आंबा,सागवान, महोगनी सारखे अनेक झाडे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे लावल्याने त्याने स्वतः प्रयोगशाळा सुद्धा सुरु केली आहे.
याआधी मात्र त्याने आपली जमीन एका उद्योजकाला भाड्याने दिली होती. ज्यात तो अशीच झाडे लावायचा. त्याची माहिती काढूनच अनिलने आपण स्वतःचं अशी शेती करण्याचे ठरवले आणि आज त्याने स्वतःची प्रयोगशाळा उभी केलीय. प्रयोगशाळेत आता तो लहान लहान रोपांवर प्रयोग करून तो झाडे बनवतोय. या रोपांना टिश्यू कल्चर पद्धतीने बनवण्यात येते.तर काही रोपे हे स्टेम कल्चर पद्धतीने उगवले जातात.
त्याच्या या कामाची दखल केंद्रीय कृषी मंत्री श्रीराधामोहन सिंग यांनी सुद्धा घेतली होती. अश्या पद्धतीची शेती आपल्या बिहारमध्ये सुद्धा केली जाऊ शकते ,हे पाहून ते सुद्धा हैराण झाले होते.
आपल्या सर्वाना माहिती आहे की, हळद ही अनेक रोगांवर औषध म्हणून काम करते. जर शरीराला कुठे लागले तर हळदीचा लेप लावला जातो. शिवाय सर्दी असेल तर दुधात हळद पावडर टाकून प्यायला दिले जाते. म्हणूनच कुमारने आपल्या प्रयोगशाळेत जास्त करून हळद आणि कुकर्मीनचे जास्त उत्पादन केले जाते. येणाऱ्या काळात हीच रोपे अतिशय महाग विकले जाणर हे त्यांना पक्के माहिती पडलंय..
अमेरिकामध्ये हे पिक गोल्डन ड्रिंक म्हणून ओळखले जाते. म्हणूनच अश्या रोपांना अमेरिकेतून जास्त मागणी आहे.
एवढचं नाही तर त्यांनी थाईलंड मधून आपल्या वातावरणात वाढतील असे अनेक रोपे आणले आहेत आणि त्यावर प्रयोगशाळेत प्रयोग करून त्यांना विकून सुद्धा कमाई करताहेत.थाईलंडच्या रोपांमध्ये त्यांनी फळरोप थाई मलाई,वाटर एप्पल,आणि बिना बियाचे लिंबू यांसारखे रोपे तयार केले आहेत. जर बिना बियांचा लिंबू लावला तर शेतात तबल 25 वर्ष त्याचे उत्पादन घेतले जाऊ शकते. ज्यातून जवळपास एका वर्षात एक एकरमध्ये तीन लाख सुद्धा कमावले जाऊ शकतात.याशिवाय त्यांनी आपल्या येथील आंबे आणि चिकू सुद्धा लावले आहेत.
अनिल कुमार वापरात असलेल्या या अनोख्या पद्धतीने तो काही काळातच देशभरात प्रसिद्ध झाला आहे. शिवाय तो या शेतीतून लाखो रुपये कमावतोय. परिसरातील शेतकरी त्याच्याकडून ही माहिती जाणून घेण्यासाठी त्याच्या शेती आणि प्रयोग शाळेला भेट देत असतात.