W,W,2,W,0,W.. ‘रणजी ट्रॉफी’ मध्ये अर्शदीप सिंग घालतोय धुमाकूळ केवळ 9 षटकांत केले एवढे गडी बाद, सोशल मिडीयावर अर्शदीप ट्रेंड..
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंग(arshdeep singh) सध्या रणजी ट्रॉफीमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. अर्शदीपने गुरुवारी मध्य प्रदेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एकापाठोपाठ चार बळी घेत संघाचे कंबरडे मोडले. एमपीला दिलेल्या फॉलोऑननंतर अर्शदीपने(arshdeep singh) शानदार गोलंदाजी करत दोन फलंदाजांना शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टार गोलंदाजाने सलामीवीर यश दुबेला 4, शुभम शर्मा 0, हर्ष गवळी 0 आणि अक्षत रघुवंशी 7 धावांवर बाद करत तंबूत पाठवले.
9 षटकांत 4 बळी घेतले.
अर्शदीपने एकूण 9 षटकांत 30 धावा देत 4 बळी घेतले. त्याने 2 मेडन षटकेही टाकली. तर मयंक मार्कंडेने 8.5 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले. सिद्धार्थ कौलने 5 षटकात 11 धावा देत 2 बळी घेतले. बलतेज सिंगला 5 षटकांत एक विकेट मिळाली. पंजाबच्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर एमपीचा संघ फॉलोऑन खेळताना ७७ धावांवर गारद झाला.

पंजाबने हा सामना 122 धावांनी जिंकला.
पंजाबने पहिल्या डावात 443 आणि एमपीने 244 धावा केल्या. अशा स्थितीत पंजाबने फॉलो ओन देण्याचे ठरवले. पा पंजाबने एमपीला 77 धावांवर बाद करत एक डाव आणि 122 धावांनी सामना जिंकला. अर्शदीप सिंग पहिल्या डावात विकेटशिवाय गेला असला तरी दुसऱ्या डावात त्याने ज्या प्रकारे पुनरागमन केले त्यामुळे मध्यप्रदेशच्या तोंडातून विजय हिरावून घेतला गेला.
न्यूझीलंडविरुद्ध दाखवणार तगडा खेळ?
अर्शदीप नुकताच श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून परतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याचा समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत दमदार फॉर्मात असलेला अर्शदीप न्यूझीलंडविरुद्ध आपल्या गोलंदाजीचा प्रसार करताना दिसणार आहे. ही मालिका २७ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…