Asian Games 2023: शफाली वर्माने रचला इतिहास.. आशियाई खेळामध्ये अशी कामिगीरी करणारी ठरली पहिला महिला खेळाडू…
आशियाई क्रीडा 2023 (Asian Games 2023) च्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत गुरुवारी भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना मलेशियाशी झाला. मलेशियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 15 षटकात 2 गडी गमावून 173 धावा केल्या. पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट मैदानावर पावसामुळे सामना काही वेळ थांबवला गेला होता.
या सामन्यात भारताची सलामीवीर शफाली वर्माने (shafali Varma) चमकदार कामगिरी केली. तिच्या 39 चेंडूत 67 धावांच्या खेळीने भारताची धावसंख्या 173/2 अशी झाली. यासह भारतीय सलामीवीर शफाली वर्माने (shafali Varma) च पहिल्याच सामन्यात इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत अर्धशतक झळकावणारी शेफाली(shafali Varma) पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिला सामना मलेशियाविरुद्ध खेळत होते. मात्र, हा थेट उपांत्यपूर्व सामना आहे. या सामन्यात भारतीय संघाची बाजू जमेची मानली जात आहे. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kour) अनुपस्थितीत स्मृती मानधना (Smaruti Mandhana) मलेशियाविरुद्ध टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने शेफाली आणि जेमिमा यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर १७३ धावा केल्या.
WHAT AN INNINGS PLAYED BY SHAFALI VERMA…!!!!
She smashed 67 runs from 39 balls including 4 fours and 5 Sixes in Asian Games 2023, She is first Indian to score a fifty in Asian Games – Take a bow, Shafali Verma!#AsianGames2023 #ShafaliVerma pic.twitter.com/XUisFLxxCf
— king_kohli_FanClub (@RavindraNain29) September 21, 2023
शेफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा 2023 जिंकण्यासाठी मलेशियाला 15 षटकात 174 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे षटकांची संख्या कमी करून प्रति डाव 15 षटके करण्यात आली.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताची सुरुवात चांगली झाली. स्मृती मानधना (२७) हिने शेफालीसह पहिल्या विकेटसाठी ५.२ षटकात ५७ धावा जोडल्या. यानंतर शेफालीने जेमिमासोबत डाव पुढे नेत दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भक्कम भागीदारी केली.

शेफालीने 39 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या, तर जेमिमाने 29 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या, ज्यात तिने 6 चौकार मारले. रिचा घोषने 7 चेंडूत 21 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यामुळे भारताने 15 षटकात 2 गडी गमावून 173 धावा केल्या. दरम्यान, भारतीय संघाने 28 चेंडूत 22 चौकार आणि 6 षटकार लगावत 128 धावा केल्या. मलेशियाकडून मास अलिसा आणि माहिरा इज्जती इस्माईलने 1-1 बळी घेतला.
हा सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघामध्ये समान गुण विभागून देण्यात आले आहेत.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..