अक्षर पटेलला मेहा पटेलने केले क्लिन बोल्ड! लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..
Axar Patel and Meha Patel marriage photos went viral on social media

भारतात सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. ३ दिवसांपूर्वी (२३ जानेवारी) भारतीय संघातील स्टार फलंदाज केएल राहुल विवाह बंधनात अडकला. त्याने अभिनेत्री अथिया शेट्टी सोबत विवाह केला. तर गुरुवारी (२६ जानेवारी) भारतीय संघातील आणखी एक खेळाडू अक्षर पटेलने मेहा पटेल सोबत विवाह सोहळा उरकला आहे. या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
अक्षर पटेलने बीसीसीआय कडून काही दिवसांसाठी सुट्टीची मागणी केली होती. हेच कारण होते की, त्याला न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आणि टी -२० मालिकेसाठी स्थान देण्यात आले नव्हते. डाव्या हाताच्या या अष्टपैलू खेळाडूने गेल्या वर्षी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी फिल्मी स्टाईलने आपली प्रेयसी मेहाला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. तसेच नुकताच संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये अक्षर पटेल आपल्या पत्नीला उचलून डान्स करताना दिसून येत आहे.
तसेच भारतीय संघातील खेळाडूंना आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढणं जरा कठीण जात आहे. त्यामुळे ते या विवाह सोहळ्यात उपस्थित राहू शकले नाही. केवळ मोहम्मद कैफ आणि जयदेव उनाकडट यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
आज क्रिकेटर अक्षर पटेल और मेहा की शादी हो रही है. #axarpatel #AxarPatelWedding #cricketer #cricket #weddingdance #wedding #INDvsNZ #cricket pic.twitter.com/4lZAEuTvFj
— Shivam शिवम (@shivamsport) January 26, 2023
रवींद्र जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने अक्षर पटेलला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळत होती. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेत,चांगली कामगिरी केली. तसेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी अक्षर पटेलची निवड करण्यात आली आहे. या मालिकेतून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.