टीम इंडियाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करणाऱ्या ‘चेतन शर्मा’ वर बीसीसीआय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत? लवकरच चेतन शर्मावर केली जाऊ शकते ही कारवाई..
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता ‘चेतन शर्मा’ सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. नुकताच त्यांच्या मीडिया स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चेतन शर्माने विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद आणि रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील वादाबद्दल बोलले आहे.
टीम इंडियाशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर चेतन शर्माने एका कार्यक्रमात भाष्य केल होते. पण त्याचे स्टिंग ऑपरेशन होत असल्याची माहिती त्यांना नव्हती. त्यानंतर आता ते अडचणीत सापडले आहेत.
View this post on Instagram
बीसीसीआय कठोर पावले उचलण्याच्या तयारीत..
चेतन शर्माचे स्टिंग ऑपरेशन व्हायरल झाल्यानंतर बीसीसीआय त्याच्यावर कठोर कारवाई करू शकते. त्यांची खुर्चीही जाऊ शकते, असेही बोलले जात आहे. चेतन शर्माचे स्टिंग ऑपरेशन झी न्यूजने केले आहे. यादरम्यान त्याने महत्त्वाचे खुलासे केले आहेत.
बीसीसीआय टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर ‘चेतन शर्मा’ यांच्यावर नाराज होते आणि आता त्यांचे स्टिंग ऑपरेशन व्हायरल झाल्याने त्यांना पदावरून हटवण्याचे काम बीसीसीआय करत आहे. चेतन शर्मा अंतर्गत मुद्द्यांवर बाहेरच्या व्यक्तीशी बोलत असल्याने बीसीसीआयही त्यांच्यावर नाराज आहे.

बीसीसीआयच्या एका विश्वासू अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, ‘चेतन शर्मा निवड समितीमध्ये राहणार की नाही याचा निर्णय बीसीसीआयचे सचिव जय शाह घेतील. टी-20 कर्णधार हार्दिक पांड्या एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माने अंतर्गत चर्चेला खतपाणी घालण्याचे काम केले आहे हे जाणून निवड बैठकीत चेतनसोबत बसायचे का, हा प्रश्न आहे?
विशेष म्हणजे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात व्यस्त असताना चेतन शर्माचे स्टिंग ऑपरेशन उघड झाले आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आहे, तर दुसरा सामना १७ फेब्रुवारीपासून दिल्लीत खेळवला जाणार आहे.
हे ही वाचा..
दुसऱ्या कसोटीतही श्रेयस अय्यर संघाबाहेर? वाचा काय म्हणाले हेड कोच राहुल द्रविड…
पाकिस्तानने १९९२ चा WC केव्हा जिंकला होता? अभिनेत्रीने दिलेले उत्तर पाहून हसून हसून व्हाल लोटपोट..