VIRAL VIDEO: 6,6,6,0,6,6..बेबी एबी डिव्हिलियर्समध्ये अवतरला खरा ‘डिव्हिलियर्स’, बेबी एबीने एकाच षटकात लगावले 5 जबरदस्त षटकार,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या टी-20 लीगला धमाकेदार सुरुवात झाली आहे. मंगळवारी या लीगमधील पहिला सामना एमआय केपटाऊन आणि पार्ल रॉयल्स यांच्यात झाला. हा रोमहर्षक सामना एमआय कॅप टाऊनने 8 गडी राखून जिंकला. या सामन्याचा हिरो ठरला बेबी एबी डिव्हिलियर्स म्हणून ओळखला जाणारा डेवाल्ड ब्रेविस, ज्याने धडाकेबाज खेळी करत 70 धावा करून समोरच्या संघाची धूळ चाटली.
डेवाल्ड ब्रेविसने पाच षटकार ठोकले.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसने एमआय केपटाऊनसाठी पदार्पणाच्या सामन्यात कोणालाही निराश केले नाही. त्याने 78 धावा करत संघाला विजय मिळवून दिला, तर या खेळीत त्याने 5 षटकार आणि 4 चौकारही लगावले. देवाल्डने वेगवेगळ्या ठिकाणी फटके मारले आणि सर्व गोलंदाजांची धुलाई केली. ब्रेविसचा एक शॉट स्टँडच्याबाहेर जाऊन पडला, ज्यामुळे स्टेडियममधील लोक भलतेच खुश झाले होते.

या सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेताना पार्ल रॉयल्सकडून यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरने ४२ चेंडूत ५१ धावा केल्या तर डेव्हिड मिलरने ४२ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी ओयन मॉर्गन 19 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पार्ल संघाने 20 षटकात 7 विकेट गमावत 142 धावा केल्या. प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या जोफ्रा आर्चरने एवढ्या कमी धावसंख्येवर आपला डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने ३ बळी घेतले.
143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, MI केपटाऊनने ब्रेविस आणि रायन रिकेल्टन यांच्यामुळे सुरवातीपासूनच सामन्यावर पकड बनवून होती. दोघांनी 10.1 षटकांत 90 धावा जोडून संघाच्या विजयाचा पाया रचला. यानंतर रायन बाद झाला पण ब्रेविसने एकहाती सामना आपल्या खिशात घातला आणि 27 चेंडू शिल्लक असताना संघाला विजय मिळवून दिला.
पहा व्हिडीओ:
The Newlands crowd was thoroughly entertained by Dewald Brevis 👏#MICTvPR #Betway #SA20 | @Betway_India pic.twitter.com/f546OVExOW
— SA20_League (@SA20_League) January 10, 2023
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या: