ENG vs PAK: बेन स्टोक्सने मारला एवढा खतरनाक थ्रो की स्टंपचे झाले तुकडे,अंपायरआणि पाक कर्णधार बाबर आझमने दिले असे रिएक्शन.. व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
ENG vs PAK: बेन स्टोक्सने मारला एवढा खतरनाक थ्रो की स्टंपचे झाले तुकडे,अंपायरआणि पाक कर्णधार बाबर आझमने दिले असे रिएक्शन.. व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
एकीकडे भारत-बांगलादेश यांच्यात पहिली कसोटी खेळली जात आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान-इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत आश्चर्यकारक दृश्ये समोर येत आहेत. असाच एक देखावा पहिल्याच दिवशी समोर आला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने विकेटवर इतका धोकादायक थ्रो मारला की स्टंपच तुटला. हे दृश्य 64 व्या षटकात दिसले.
पाकिस्तानचे फलंदाज आगा सलमान आणि फहीम अश्रफ हे क्रीझवर थिजले होते. लीचने ओव्हरचा चौथा चेंडू टाकताच 17 धावांवर खेळत असलेल्या सलमानने धाव घेण्याचा प्रयत्न केला.

सलमानचा फटका मिड ऑनच्या दिशेने गेला तेव्हा येथे उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षक बेन स्टोक्सने चेंडू पकडला आणि नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला असा थ्रो मारला की मधला स्टंप तुटला. स्टोक्सचा थ्रो इतका धोकादायक होता की , थ्रो मारताच चक्क स्टंपचे तुकडे झाले.
यानंतर तुटलेला स्टंप काढून त्या जागी नवीन स्टंप लावण्यात आला. यामुळे सामना काही काळ थांबला होता. मात्र, स्टोक्सकडून आलेला थ्रो पाहून सलमान आधीच क्रीजवर पोहोचला होता. अशा स्थितीत तो धावबाद होण्यापासून वाचला, पण हे दृश्य पाहून तोच म्हण खरा ठरला की त्याने काही खाल्लं नाही, बारा आण्याला पेला फोडला.
Bullseye 🎯
The broken stump caused a brief stoppage 😳#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/9FaM0KcIIO
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 17, 2022
पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 304 धावांवर सर्वबाद झाला.
आघा सलमान 56 धावा करून बाद झाला. आणि प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 79 षटकांत 304 धावा करत सर्वबाद झाला. कर्णधार बाबर आझमने 78 तर अझहर अलीने 45 धावांचे योगदान दिले. मोहम्मद रिझवान 19 धावा करून बाद झाला.
हेही वाचा: