- Advertisement -

आयपीएल 2023 मध्ये महेंद्रसिंह धोनी नाही तर ‘हा’ खेळाडू होणार चेन्नईचा नवा कर्णधार.. स्वतः चेन्नईच्या मालकाने सांगितले कारण, वाचून तुम्हलालाही वाटेल आनंद..!

0 0

आयपीएल 2023 मध्ये महेंद्रसिंह धोनी नाही तर हा खेळाडू होणार चेन्नईचा कर्णधार.. स्वतः चेन्नईच्या मालकाने सांगितले कारण, वाचून तुम्हलालाही वाटेल आनंद..!


IPL 2023 साठी मिनी लिलाव संपुष्टात आला आहे. सर्व फ्रँचायझींनी आपापल्या संघांना मजबूत करण्यासाठी अशा खेळाडूंची निवड केली आहे, जे त्यांच्यासाठी केवळ मॅच-विनिंग इनिंग खेळणार नाहीत. त्याऐवजी ते त्यांच्या संघांना आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यासाठीही उपयुक्त ठरतील. पण जर आपण CSK बद्दल बोललो तर लिलावानंतर हा संघ खूपच चांगला दिसत आहे.

चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्सचा आपल्या संघात समावेश केला आहे, मात्र हा खेळाडू CSK कॅम्पमध्ये सामील होताच कर्णधार बनल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे.

आयपीएल 2022 च्या सुरुवातीला सीएसकेने जडेजाला कर्णधार बनवले, पण संघाची खराब कामगिरी पाहून एमएस धोनीला पुन्हा कर्णधारपद देण्यात आले. अशा परिस्थितीत, असे मानले जात आहे की यावेळी संघ व्यवस्थापन बेन स्टोक्सकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवू शकते, परंतु दरम्यान, सीएसकेच्या सीईओने सांगितले की धोनी बेन स्टोक्सला कर्णधार बनवण्याचा निर्णय वेळेत घेईल.

सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी सांगितले की, हे तर सर्वांनाच माहिती आहे की धोनीचा हा अंतिम हंगाम आहे. म्हणूनच आम्हाला दुसरा कर्णधार याच हंगामात निवडणे अधिक सोपे जाईल. आणि आम्ही स्वतः धोनीला या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकून निरोप देणार आहोत. म्हणूनच आम्ही धोनी एवजी दुसरे कोणाला तरी कर्णधार करण्याच्या विचारात आहोत, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना चेन्नईचे मालक म्हणाले कि, “आम्ही बेन स्टोक्सला घेऊन खूप उत्साहित होतो आणि आम्ही भाग्यवानही होतो कारण शेवटी तो आम्हाला मिळाला. आम्हाला एक अष्टपैलू खेळाडू हवा होता आणि एमएस धोनीला स्टोक्स मिळाल्याने खूप आनंद झाला. कर्णधारपद हा एक पर्याय आहे पण महेंद्रसिंग धोनीला वेळेनुसार निर्णय घ्यावा लागेल.

बेन स्टोक्स 16.25 कोटी रुपयांमध्ये CSK जॉइन झाला.

आयपीएल 2023 च्या लिलावात, चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने बेन स्टोक्सला त्यांच्या कॅम्पमध्ये 16.25 लाखांच्या रकमेसह समाविष्ट केले आहे. बेन स्टोक्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत 43 सामने खेळले आहेत आणि या सर्व सामन्यांमध्ये खेळाडूने 25.56 च्या सरासरीने 920 धावा केल्या आहेत ज्यात त्याच्या नावावर 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर या खेळाडूने 28 विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे.

धोनीला विजयी निरोप देण्याच्या तयारीत चेन्नईचे मालक.

धोनीचा हा आयपीएल हंगाम अंतिम असल्यामुळे त्याला या हंगामात ट्रॉफी जिंकून देऊनच निरोप द्यायचा निश्चय मालकांनी आणि खेळाडूंनी घेतल्याचे दिसतंय. साहजिक आहे धोनी इतक्या वर्षापासून चेन्नईसाठी खेळत आहे. आणि संघाची कमान एकहाती त्याने सांभाळलीय. म्हणूनच यावर्षी सुद्धा सुरवातीच्या सामन्यापासुनच धोनी एवजी बेन स्टोक्स चेन्नईचे कर्णधारपद सांभाळताना दिसू शकतो.

आयपीएल 2024 मधेही धोनी असणार चेन्नईचा हिस्सा..

खेळाडू म्हणून जरी धोनीचा हे अंतिम आयपीएल वर्ष असले तरीही धोनी पुढील अनेक आयपीएल मध्ये दिसणार हे मात्र नक्की.. स्वतः चेन्नईच्या टीम संचालकांनी याबद्दल बोलतांना सांगितले की, आम्हाला धोनी हा संघात कायम हवा आहे. मात्र आयुष्यात कधी अशी वेळ येते जेव्हा वयानुसार आपले काम निवडणे गरजेचे होते. म्हणूनच धोनी जरी खेळाडू म्हणून पुढील हंगामात सोबत नसला तरीही आम्ही धोनीला एक मोठी जिम्मेदारी देऊन संघात कायम ठेवण्याच्या विचारात आहोत..

महेंद्रसिंह धोनी

याच वक्तव्यावरून हे स्पष्ट होतंय की, धोनी आयपीएल 2024 मध्ये चेन्नईचा मुख्य कोच अथवा फलंदाजी कोच म्हणून मैदानावर दिसू शकतो. आता आयपीएल 2023 मध्ये धोनी स्वतः  चेन्नईची कमान सांभाळतो की स्टोक्सला तयार करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.


हेही वाचा:

बेन स्टोक्सच्या येण्याने चेन्नई सुपर किंग्समध्ये झालेत जगातील सर्वांत सर्वश्रेष्ठ असे हे 3 अष्टपैलू खेळाडू, आयपीएल 2023ची ट्रॉफी जिंकून धोनीला देणार आनंदाने निरोप..

केएल राहुलने कसोटी कर्णधार म्हणून पहिली कसोटी मालिका जिंकली ते अश्विनने रचला इतिहास.. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीमध्ये झाले हे 12 विक्रम, भारतीय संघाच्या खेळाडूंनी मोडले दिग्गजांचे विक्रम..

‘अश्विन अण्णा अंगार है, बाकी सब..’ हरत असलेल्या सामना अश्विन,श्रेयसने बांग्लादेशच्या हातातून हिसकावला तर सोशल मिडीयावर चाहते झाले भलतेच खुश, सोशल मिडियावर होतंय कौतुक, पहा व्हिडीओ.

Leave A Reply

Your email address will not be published.