जर हे 3 खेळाडू टीम इंडियाचे उपकर्णधार बनले तर भारत हा जगातील सर्वात धोकादायक कसोटी क्रिकेट संघ बनेल.
क्रिकेट आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ नसला तरी देशातील सर्वाधिक लोकांचा आवडता खेळ हा क्रिकेट आहे. आपल्या देशातील अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. आपला भारतीय क्रिकेट संघ हा जगभरात प्रसिद्ध आहे शिवाय जगातील सर्वात कठीण संघांमधील एक संघ आहे.
भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुलची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र नवीन उपकर्णधाराची घोषणा अजून सुद्धा झालेली नाही. तसे, सध्या टीम इंडियामध्ये असे 3 खेळाडू आहेत, कसोटी संघाचा नवा उपकर्णधार होण्यासाठी अगदी योग्य आहेत. हे 3 खेळाडू जर उपकर्णधार झाले तर भारतीय संघ जगातील सर्वाधिक धोकादायक कसोटी क्रिकेट संघ बनेल.
शुभमन गिल:-
हा भारतीय क्रिकेट संघाचा स्टार युवा सलामीवीर फलंदाज असून तो टीम इंडियाचा पुढील कसोटी उपकर्णधार बनण्याची शक्यता आहे. तो एक आक्रमक ओपनर फलंदाज आहे. तसेच क्रिकेट मधील परफॉर्मन्स सुद्धा चांगला आहे.
श्रेयस अय्यर :-
श्रेयस अय्यर हा तरुण फलंदाज आहे, त्याने भारतासाठी आतापर्यंत 10 कसोटी सामने खेळले आहेत ज्यात त्याने 666 धावा केल्या आहेत. तो 28 वर्षांचा आहे. तो कसोटीत सहाव्या क्रमांकावर आणि टीम इंडियामध्ये शानदार फलंदाजी करतो
ऋषभ पंत :-
ऋषभ पंत हा यष्टिरक्षक फलंदाज असून कसोटीत त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. टीम इंडियाचा पुढचा कसोटी कर्णधार होण्याच्या शर्यतीत तो आघाडीवर दिसत आहे. परदेशी भूमीवर त्यांनी भारताला एकहाती विजय मिळवून दिला आहे.