IPL संदर्भातील सर्वात मोठे अपडेट, पाकिस्ताननंतर आता या दोन देशांच्या खेळाडूंवरही बंदी घालण्यात येणार आहे.
आपल्या देशातील निम्म्याहून अधिक लोक आयपीएल चे दिवाणे आहेत अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वजण क्रिकेट आवडीने पाहतात. आपल्या देशात अनेक वेगवेगळे खेळ खेळले जातात परंतु सर्वात जास्त पसंती ही क्रिकेट खेळला दिली जाते. आयपीएल मध्ये खेळण्यासाठी अनेक वेगवेगळ्या देशातून खेळाडू भारतात खेळण्यासाठी येतात. परंतु आपल्या देशात आयपीएल मध्ये पाकिस्तानी खेळाडूना खेळायला परवानगी दिली जात नाही हे तुम्हाला माहितच असेल.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला यंदा च्या आयपीएल ला पाकिस्तान बरोबर अजून कोणत्या देशातील खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे ते तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
आयपीएल चा नवीन सिझन 31 मार्च पासून सुरू होणार आहे. यंदा च्या वर्षी आयपीएल मध्ये अनेक बदल केलेले आहेत परंतु आयपीएल मध्ये बीसीसीआय ने दोन देशातील खेळाडूंवर आयपीएल मध्ये खेळण्यास बंदी घातली आहे.
मीडिया रिपोर्ट् नुसार बीसीसीआय ने आयपीएलचा नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी श्रीलंका आणि बांगलादेश या दोन देशातील खेळाडूंना आयपीएल खेळण्यास बंदी घालण्याची दाट शक्यता आहे. कारण या दोन देशांचे खेळाडू आयपीएलमध्ये उशिराने आपल्या संघात सहभागी होणार असून या निर्णयामुळे बीसीसीआय नाराज आहे. त्यामुळे या देशांच्या खेळाडूंवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या देशातील खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे बांगलादेशचे खेळाडू १५ मे पासून आपल्या देशात येऊन आयपीएल खेळू शकणार आहेत. तर श्रीलंकेचे खेळाडू एप्रिल मध्ये आयपीएल खेळण्यासाठी येणार असल्यामुळे बीसीसीआय नाराज आहे. त्यामुळे या दोन देशातील खेळाडू वेळेवर संघात सामील न होऊ शकल्यामुळे BCCI तसेच IPL सुद्धा नाराज आहे.