- Advertisement -

सामन्याच्या अंतिम टप्यात येऊन शतक ठोकणारे 5 दिग्गज फलंदाज. जाणून घ्या कोण आहेत ते दिग्गज.

0 0

क्रिकेटच्या दुनियेत ज्या टीम ची बॅटिंग चांगली असते त्या टीम ला चांगली टीम मनाली जाते. तुम्ही पहिले असेल कि ओपनिंगला उतरणारे पहिले 3 ते 4 च खेळाडू असे असतात जे शतक मारतात. पण तुम्हाला जाणून आश्यर्य होईल, असे काही बॅट्समन होऊन गेले जे 8 नंबर ला बॅटिंग ला आले तरीही त्यांनी शतक झळकावले. यामध्ये एक इंडियन टीमचा खेळाडू सुद्धा आहे. हे फारच कमी लोकांना माहिती आहे.

जयंत यादव (104 रन)
हा पराक्रम करणारा जयंत हा भारताचा एकमेव बॅट्समन आहे. जयंतने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावले होते. जयंत फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या सात गडी बाद 364 अशी होती. दुसरीकडे भारतीय कर्णधार विराट कोहली फलंदाजी करत होता. कोहलीसह जयंतने शानदार फलंदाजी करताना 104 धावांची खेळी केली.

शॉन पोलक (111 रन )
2011 मध्ये श्रीलंकेविरुद्ध सुरुवातीला बॅटिंग करताना दक्षिण आफ्रिकेने 204 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. यानंतर शॉन पोलॉक आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पोलॉकने 106 चेंडूत 111 रन्स केल्या.

जैक ग्रेगरी (100 रन )
ऑस्ट्रेलियाच्या जॅक ग्रेगरीने 1921 मध्ये मेलबर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते.

लेंस क्लूजनर (नाबाद 102 रन)
1997 मध्ये भारताविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेने 529 रन्स केल्या . त्यावेळी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लेंस क्लूजनरने नाबाद 102 रन्स केल्या.

स्टुअर्ट ब्रॉड (169 रन)
2010 मध्ये लॉर्ड्स मैदानावर खेळलेला पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना स्पॉट फिक्सिंगसाठी ओळखला जातो. ज्यात मोहम्मद अमीर आणि मोहम्मद आसिफ अडकले होते. पण स्टुअर्ट ब्रॉडची 169 धावांची शानदार खेळी या सामन्यात जाम रंगली.

आशा प्रकारे नंबर 8 वरती खेळायला आलेले खेळाडू शतक ठोकून इतिहासात नोंद करुन गेले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.