- Advertisement -

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डावर कोसळला दुखाचा डोंगर.. या दिग्गज खेळाडूचे झाले निधन,पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त कामगिरीकरून एकहाती जिकून दिली होती सिरीज..

0 2

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डावर कोसळला दुखाचा डोंगर.. या दिग्गज खेळाडूचे झाले निधन,पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त कामगिरीकरून एकहाती जिकून दिली होती सिरीज..


भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (IND vs SL) गुवाहाटी येथे खेळला गेला ज्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान, क्रिकेट विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. खरंतर, क्रिकेट जगतातील एका दिग्गज खेळाडूचे अचानक निधन झाले, त्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. चला जाणून घेऊया त्या खेळाडूबद्दल.

निधन

दिग्गज क्रिकेटपटूचे निधन

खरं तर, आम्ही ज्या क्रिकेटरबद्दल बोलत आहोत त्याचे नाव ब्रूस मरे आहे, जो न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर आहे. मरे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. हा माजी क्रिकेटपटू न्यूझीलंडकडून खेळला ज्याने फेब्रुवारी 1968 मध्ये कसोटी क्रिकेटच्या विश्वात पदार्पण केले. मरेने किवी संघासाठी 13 सामने खेळले आणि 23.92 च्या सरासरीने 598 धावा केल्या, ज्यात 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

त्याचवेळी त्याने पाकिस्तानविरुद्ध दमदार खेळी केली. ब्रुस मरेने कमी धावसंख्येच्या सामन्यात संघाला पहिल्या डावात १२७ धावांची निर्णायक आघाडी घेण्यास मदत केली जिथे किवींनी कसोटी ५ गडी राखून जिंकली, त्यानंतर न्यूझीलंडने मालिका १-० ने जिंकली. तसेच  तो विजय न्यूझीलंडचा पाकिस्तानवरचा पहिला कसोटी मालिका विजय होता.

न्यूझीलंड क्रिकेटने शोक व्यक्त केला.

विशेष म्हणजे ब्रूस मरे यांच्या निधनावर न्यूझीलंड क्रिकेटने शोक व्यक्त केला आहे. मंडळाने आपल्या पुरुष आणि महिला संघांच्या ट्विटर खात्यांद्वारे मरेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

 ricketer Bruce Alexander Grenfell Murray Passed Away

शोक व्यक्त करताना बोर्डाने लिहिले,

“माजी कसोटी फलंदाज आणि दिग्गज ब्रुस मरे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाल्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. ‘बॅग्स’ नावाने तो सर्वत्र प्रसिद्ध होता.1968 ते 71 दरम्यान त्यांनी  23.92 च्या सरासरीने 13 कसोटी खेळल्या. न्यूझीलंडच्या अमेलिया आणि जेस केर यांचे ते आजोबा होते. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुखात सहभागी आहोत. असे ट्वीट बोर्डाने केले आहे.

ब्रूस मरे यानी न्यूझीलंडकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 102 सामन्यांमध्ये 6257 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 6 शतके आणि 43 अर्धशतके आहेत. यादरम्यान त्यांची सर्वोच्च धावसंख्या 213 होती. त्याच वेळी, ब्रूसने लिस्ट ए मॅच खेळली ज्यात त्यांनी 6 धावा केल्या.त्यांच्या जाण्याने क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू गमावावा लागला आहे..


आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:

VIRAL VIDEO: नसीम शहाने टाकला एवढा जबरदस्त योर्कर की, न्यूझीलंडच्या या स्टार फलंदाजाला काही कळायच्या आतचं उडाले स्टंप, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: आडवा पडून सूर्यकुमार यादवने मारला एवढा जबरदस्त षटकार की श्रीलंकेचा कोच सुद्धा झाला हैराण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

8 षटकार 6चौकार.. सुर्यकुमार यादव ने श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढत ठोकले ताबडतोब शतक, श्रीलंकेसमोर विजयासाठी तब्बल एवढ्या धावांचे विशाल लक्ष…

Leave A Reply

Your email address will not be published.