आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले हे तीन खेळाडू दोन वेळचे अन्न आणि पाणी मिळविण्यासाठी चक्क करतात बस ड्रायव्हर ची नोकरी, जाणून घ्या सविस्तर
सर्वात जास्त पैसा कुठ मिळतो तर एक तर क्रिकेट मध्ये आणि दुसरं म्हणजे बॉलिवूड मध्ये. या दोन्ही क्षेत्रात पैसा आणि प्रसिद्धी ही मोठ्या प्रमाणात मिळत असते हे आपल्याला माहीतच आहे. महागड्या गाड्या, महागडी कपडे, महागडी घरे तसेच सामान्य लोकांपेक्षा जीवनशैली अत्यंत वेगळी असते.

परंतु तुम्हाला आम्ही या लेखात अश्या 3 खेळाडू बद्दल सांगणार आहे जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये खेळले परंतु आता आपल्या कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी बस ड्रायव्हर म्हणून नोकरी करत आहेत. तर जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.
सूरज रणदीव :-
सूरज हा श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी स्पिनर गोलंदाज होता. परंतु आर्थिक तंगी मुळे तो आता ऑस्ट्रेलिया मध्ये बस ड्रायव्हर ची नोकरी करत आहे. तसेच सूरज आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग या संघामध्ये सुद्धा काही काळ खेळला होता.
वेडिंगटन म्वायेंगा:-
झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू वॅडिंग्टन मवायंगा 2005 ते 2006 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. मात्र त्यानंतर त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. मवायंगा ऑस्ट्रेलियात दोन वेळची भाकरी आणि पाण्यासाठी एका ठिकाणी बस ड्रायव्हर ची नोकरी करून आपले आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत आहे.
चिंतका जयासिंघे:-
चिंताका जयसिंघे हा श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आहे, जो सध्या मेलबर्न येथे बस चालक म्हणून काम करत आहे. चिंतका हा त्याच कंपनीत बस चालक आहे ज्यासाठी सूरज रणदिव बस चालवतो. चिंताकाने 2009 मध्ये भारताला भेट दिली होती. शिवाय 3 आंतरराष्ट्रीय सामन्यात सुद्धा चींतका खेळला होता.