जाणून घ्या भारतीय क्रिकेट जगतातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंचे हे आहेत आवडते पदार्थ, जाणून घ्या प्रत्येक खेळाडूचे आवडते पदार्थ.

आपल्या भारतात सर्वात जास्त वेड हे क्रिकेट चे आहे. त्यामुळे प्रत्येकालाच कोणता ना कोणता क्रिकेटर हा आवडतच असतो तसेच प्रत्येक फॅन हा आपल्या आवडत्या क्रिकेटर चे अनुकरण करतच असतो. तसेच क्रिकेटर बद्दल अनेक वेगवगळ्या गोष्टी जाणून घेण्याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता असतेच.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे त्यांना हे पदार्थ खूपच प्रिय आहेत तर चला तर जाणून घेऊया सविस्तर.
कोणताही क्रिकेटर असो किंवा सेलिब्रिटी असतो खाण्याचा मोह हा पप्रत्येक जनाला हा असतोच. प्रत्येकाचे कोणते ना कोणते पदार्थ हे आवडीचे असतातच परंतु जगप्रसिद्ध असलेल्या या खेळाडूंचे कोणते पदार्थ आवडीचे आहेत हे आज सांगणार आहे.
महेंद्रसिंह धोनी:-
महेंद्रसिंह धोनीला चिकन खायला मोठ्या प्रमाणात आवडते. यामध्ये चिकन बटर मसाला, चिकन टिक्का हे मोठ्या प्रमाणात आवडतात. याशिवाय धोनीला गाजराचा हलवा आणि खीर ही खायलाही खूप आवडते.
विराट कोहली:-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल सांगायचे तर, विराट कोहली ला छोले भटूरे, आलू पराठा आणि चिकन खायला मोठ्या प्रमाणात आवडते.
रोहित शर्मा:-
भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माला आलू पराठा खूप आवडतो. त्याला अंडी खायलाही आवडतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे चायनीज फूडही आवडीने खातो.
सचिन तेंडुलकर:-
सचिन तेंडुलकरला खाण्यापिण्याची खूप आवड आहे. त्याला बंगाली पदार्थ मोठ्या प्रमाणावर आवडतात. सचिनला बंगाली स्टाईलमध्ये शिजवलेली ‘झिंगा मछली’ खूप आवडते.
मोहम्मद शमी:-
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बिर्याणी खाण्याचा शौकीन आहे. पण त्याच्या फिटनेससाठी त्याने बिर्याणी खाण्याचे प्रमाण खूपच कमी केले आहे.