सचिनच्या विक्रमाशी बरोबरी तर विराट, पाँटिंगला टाकले मागे…100 व्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक झळकावताच डेव्हिड वॉर्नर स्टेडियममध्ये बसलेली पत्नी लागली आनंदाने उड्या मारायला, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
सचिनच्या विक्रमाशी बरोबरी तर विराट, पाँटिंगला टाकले मागे…100 व्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक झळकावताच डेव्हिड वॉर्नर स्टेडियममध्ये बसलेली पत्नी लागली आनंदाने उड्या मारायला, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक झळकावले आहे. मेलबर्नमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्याने ही कामगिरी केली.
वॉर्नरने डावाच्या 144 व्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या चेंडूवर चौकार मारून आपलेशतक पूर्ण केले आणि त्यांतर जबरदस्त फलंदाजी करत कसोटीतील दुहेरी शतक सुद्धा पूर्ण केले. मात्र दुहेरी शतकाचा आनंद साजरा करतांना त्याला दुखापत झाली आणि तो सामन्यातून बाहेर पडला.

36 वर्षीय वॉर्नर हा 100 व्या कसोटीत शतक झळकावणारा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील 10 वा फलंदाज आहे. त्याचवेळी, या विशेष यादीत स्थान मिळवणारा तो ऑस्ट्रेलियाचा एकमेव दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी रिकी पाँटिंगने ही कामगिरी केली होती. पॉन्टिंगने आपल्या 100व्या कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावली. पाँटिंगने 2006 च्या न्यू इयर टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिडनीमध्ये ही कामगिरी केली होती.
वॉर्नर गेल्या काही काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. त्याच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत होते. त्याच्या कारकिर्दीतील हे 25 वे शतक आहे. गेल्या 27 डावांत त्याला शतकही गाठता आले नाही. वॉर्नरला त्याच्या शतकासाठी 1086 दिवस वाट पाहावी लागली. वॉर्नरने 6 जानेवारी 2020 रोजी शेवटचे कसोटी शतक झळकावले होते.
वॉर्नरने २०११ मध्ये कसोटी पदार्पण केले होते. या खेळीदरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावांचा टप्पाही पार केला. अशी कामगिरी करणारा तो 8वा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे.
डेव्हिड वॉर्नरनेही आपल्या 100व्या वनडेत शतक झळकावले. त्याने 2017 मध्ये बंगळुरूमध्ये भारताविरुद्ध शतक झळकावले होते.
या 25व्या शतकासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत त्याच्या पुढे सुनील गावस्कर (३३), अॅलिस्टर कुक (३१), मॅथ्यू हेडन (३०) आणि ग्रॅम स्मिथ आहेत.
Wow🤩What a achivement.!!
🏏Scored a hundred in 100th ODI.
🏏Scored Double💯 in 100th Test.
Tough year for #warner captaincy & poor form but he answered it.@davidwarner31 joins Gordon Greenidge as the only two men Scored century in 100th game. #AUSvsSA#PhoenixBird #NeverGiveUp pic.twitter.com/mV0Hs07kIz— SachinSiva (@sachinsiva003) December 27, 2022
वॉर्नरच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५ शतके आहेत. सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीनंतर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सलामीवीर म्हणून सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या (45) विक्रमाची बरोबरी केली.
Nearly 220 million Asian were waiting for a double century today. You made it happened @davidwarner31. Well played bro…@Noor_Marriii 😂😂😂😂#AUSvSA #PakvsNZ#Warner #Dabur
— Marimuthu Anandan (@mari_muthu) December 27, 2022
वॉर्नरने शतक झळकावताच प्रेक्षकांच्या गॅलरीत बसलेल्या त्याच्या पत्नीनेही आनंदाने उड्या मारल्या. त्याचवेळी त्यांच्या मुलींनीही वडिलांच्या या कामगिरीवर टाळ्या वाजवायला सुरुवात केली. वॉर्नरने त्याच्या कुटुंबीयांना आणि बॉक्सिंग डे कसोटी सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनाही फ्लाइंग किस देऊन शुभेच्छा दिल्या.