AUS vs SA LIVE: 6,2,4,4,0,0ऑस्ट्रोलीयन वाघाचा दरारा…. डेव्हिड वॉर्नरने ठोकले कसोटीत शानदार द्विशतक,एकाच षटकात ठोकल्या एवढ्या धावा…
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रोलीया यांच्यातील दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या दिवशी ४५ धावांनी डावाला सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि लॅबुश्ने यांनी डाव पुढे नेला. मात्र, दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कांगारू संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत भक्कम आघाडी घेतली आहे.
45 धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात कांगारू संघासाठी खूपच निराशाजनक झाली. दुसऱ्या दिवशी लबुश्ने आपल्या डावात केवळ 9 धावा जोडू शकला आणि 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्याच्याच चुकीने धावबाद झाला. यानंतर वॉर्नर आणि स्मिथमध्ये अप्रतिम भागीदारी पाहायला मिळाली. दोघांनी मिळून डावाला दमदार आयाम दिला. दरम्यान, डेव्हिड वॉर्नरने कसोटी कारकिर्दीतील द्विशतक झळकावले.
पण, 200 धावांचा आकडा गाठल्यानंतर लगेचच सेलिब्रेशन करताना त्याने स्वत:ला दुखापत केली आणि दुखापतीनंतर त्याला ड्रेसिंग रूममध्ये परतावे लागले. बाहेर जाण्यापूर्वी वॉर्नरने 254 चेंडूंचा सामना करत 200 धावांची जलद खेळी केली. त्याच्या खेळीत 16 चौकार आणि 2 आकाशी षटकारही होते. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील वॉर्नरचे हे तिसरे द्विशतक आहे.
कांगारू संघाने 197 धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात कांगारूंच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 189 धावांत गारद झाला. यानंतर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाने डावाची सुरुवात अडखळत केली. सलामीवीर उस्मान ख्वाजा अवघ्या 1 धावा करून बाद झाला. यानंतर लबुश्नेही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही.
यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात २३९ धावांची अप्रतिम भागीदारी झाली. मात्र, स्मिथचे शतक अवघ्या 15 धावांनी हुकले आणि तो 85 धावांवर अॅनरिक नॉर्टजेचा बळी ठरला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 386 धावा केल्या आहेत. क्रीझवर हेड 48 आणि अॅलेक्स कॅरी 9 धावांवर खेळत आहे. यासह कांगारू संघाने 197 धावांची आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, प्रोटीज संघाकडून रबाडा आणि नोर्टजे यांनी 1-1 बळी घेतला.