कसोटीमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावणारे सध्याचे खेळाडू, हा भारतीय खेळाडू अव्वल स्थानी.

आपल्या देशाचा हॉकी हा राष्ट्रीय खेळ असला तरी आपल्या देशात हॉकी पेक्षा क्रिकेट खेळाचे जास्त वेड आहे. देशातील बहुतांशी लोक क्रिकेट चे फॅन्स आहेत तसेच आपल्या देशात क्रिकेट ला खेळ अत्यंत आवडीने पहिला आणि खेळला जातो.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्या खेळाडूंनी कसोटी मध्ये सर्वाधिक द्विशतक ठोकले आहेत. तर जाणून घेऊया नक्की कोण आहेत हे खेळाडू.
1)विराट कोहली:-
विराट कोहली हा भारतीय संघाचा कर्णधार तसेच एक दिग्गज फलंदाज सुद्धा आहे. तसेच भारताच्या सर्वोत्तम फलंदाजामध्ये विराट कोहली ला अव्वल स्थान आहे. विराट कोहली ने 104 कसोटी सामने खेळले आहेत आणि 7 द्विशतके केली आहेत आणि अजूनही खेळत आहे.
2)केन विल्यमसन:-
केन विल्यमसन हा न्युजलंड संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. न्यूझीलंडच्या केन विल्यमसनबद्दल बोलायचे तर त्याने आतापर्यंत ८९ कसोटी सामने खेळले आहेत ज्यात त्याने ५ द्विशतके झळकावली आहेत.
3)जो रूट:-
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटबद्दल सांगायचे झाले तर, जो रूट ने आतापर्यंत कसोटीत 127 सामने खेळले आहेत. या 127 सामन्यात जो रूट ने पाच द्विशतके झळकावली आहेत.
4)स्टीव्ह स्मिथ:-
सध्याच्या सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये स्टीव्ह स्मिथ या खेळाडूने आपले नाव या यादीत चौथ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे, स्मिथ ने 91 कसोटी सामने खेळून चार द्विशतके झळकावण्यात यश मिळवले आहे.
5)डेव्हिड वॉर्नर:-
डेव्हिड वॉर्नर ने आतापर्यंत कसोटी फॉरमॅटमध्ये तीन द्विशतके झळकावली आहेत. त्याने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात द्विशतकही झळकावले.
6)चेतेश्वर पुजारा:-
या यादीत चेतेश्वर पुजारा सहाव्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत कसोटीत तीन द्विशतके झळकावली आहेत. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 98 कसोटी सामने खेळले आहेत.