- Advertisement -

रवी शास्त्रीने वर्ल्डकप संघ निवडकर्त्यावर केले मोठे आरोप, “मुद्दाम या स्टार खेळाडूला संघातून बाहेर ठेवले”

0 0

माजी कोच रवी शास्त्रीने सांगिलते २०१९ वर्ल्डकपमधील काळे कारनामे, या खेळाडूला मुद्दाम दिली नव्हती संधी..


विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर बीसीसीआयने रोहित शर्माला भारताचा नवा वनडे कर्णधार बनवले आहे, ज्याबद्दल काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, आम्ही विराट कोहलीला दोन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद कायम ठेवण्यास सांगितले होते, परंतु त्याने फक्त टी-२० चे कर्णधारपद सोडले होते, परंतु एकदिवसीय आणि टी-२० मध्ये आम्ही वेगवेगळे कर्णधार नाही ठेऊ शकत. त्यामुळे आम्हाला त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवावे लागले आहे.

आता या वादानंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री याने एका मुलाखतीत मोठे वक्तव्य केले असून काही मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. रवी शास्त्री याने २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या निवडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. रवी शास्त्री म्हणाला की, मी त्या संघ निवडीत बोललो नाही, पण त्या संघात ३ यष्टीरक्षकांच्या निवडीमुळे मी अजिबात सहमत नव्हतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Shastri (@ravishastriofficial)

अंबाती रायुडू किंवा श्रेयस अय्यरला संधी मिळायला हवी होती. महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्या रूपाने एकाच संघात ३ विकेटकीपर घेण्यामागची कल्पना काय होती हे मला अजूनही समजलेले नाही.

रवी शास्त्रींच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रवी शास्त्री हे प्रशिक्षक होते आणि त्याच्या संघ निवडीचे कोणीही ऐकले नाही, असा त्याचा विश्वास आहे. त्यामुळे निवडकर्त्यांनी विराट कोहलीचेही ऐकले नाही की फक्त रवी शास्त्रींचेच ऐकले नाही, हा मोठा प्रश्न आहे. विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माला नवा कर्णधार बनवण्यात आले असतानाच रवी शास्त्रीने हे विधान का केले आहे? तसे रवी शास्त्रीच्या स्पष्ट मतासाठी प्रसिद्ध आहे आणि तो नंतर पुढे जाऊन काही मोठे विधान करू शकतो अशी अपेक्षा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Shastri (@ravishastriofficial)

कमेंटरी व्यतिरिक्त रवी शास्त्री हा दोन वर्षे भारतीय संघाचा संचालकही राहिला आहे. १५ जुलै २०१७ रोजी रवी शास्त्रीची भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारतीय क्रिकेट संघाने चांगली कामगिरी केली होती, परंतु त्याला एकही आयसीसी ट्रॉफी भारताला मिळवून देता आली नाही. रवी शास्त्रीच्या प्रशिक्षणाखाली भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली होती, पण अंतिम फेरीत संघाचा पराभव झाला होता.

 

याशिवाय भारतीय क्रिकेट संघ २०१९ मध्ये झालेल्या ICC क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतच पोहोचू शकली होती. रवी शास्त्रीच्या प्रशिक्षणाखाली भारतीय क्रिकेट संघ २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पहिल्या फेरीतच बाहेर पडला होता. या विश्वचषकानंतर रवी शास्त्रीने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.


हेही वाचा:

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

न्यूझीलंड विश्वचषकमधून बाहेर तर फेकला गेला मात्र, कर्णधार ‘केन विल्यमसन’ जाता जाता भारताच टेंशन वाढवणार वक्तव्य करून गेलाय..

या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..

“वर्ल्डकप मध्ये ऑरेंज कॅप सुरु करा” के.एल. राहुल पुन्हा स्वस्तात बाद झाल्याने चाहते झाले प्रचंड नाराज, सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली..

 

Leave A Reply

Your email address will not be published.